Heropanti 2 Trailer | बॉलिवूड चित्रपट हिरोपंती 2 मध्ये Tiger Shroff पुन्हा एकदा करणार ‘हिरोपंती’

पोलिसनामा ऑनलाईन टीम :- (Heropanti 2 Trailer) लॉकडाऊननंतर आता कुठं चित्रपटगृहांमध्ये चित्रपट प्रदर्शित करण्याची परवानगी मिळाली आहे. त्यामुळे सध्या अनेक चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. तर अशातच बॉलिवूड चित्रपट हिरोपंती2 या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. (Heropanti 2 Trailer)
ट्रेलर पाहून अनेकांना चित्रपट प्रदर्शित केव्हा होणार याची उत्सुकता लागली आहे. या ट्रेलरवरून हे लक्षात येतं की, हिरोपंती2 मध्येही अभिनेता टायगर श्रोफ (Tiger Shroff) आपली हिरोपंती दाखवणार आहे. तसेच यामध्ये अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकी (Nawazuddin Siddiqui) असल्याचं पाहायला मिळत आहे. यामध्ये त्याचा जोकरची भूमिका असून तो या चित्रपटामधील खलनायक (Villain) असल्याचं समजलं आहे. (Heropanti 2 Trailer)
त्याचप्रमाणे हिरोपंतीमध्ये मुख्य भूमिकेमध्ये अभिनेत्री किर्ती सेनॉन (Kriti Sanon) होती. तर आता हिरोपंती 2 मध्ये मुख्य भूमिकेमध्ये सर्वांची आवडती अभिनेत्री तारा सुतारिया (Tara Sutaria) आहे.
त्यामुळे प्रेक्षकांना कधी हिरोपंती 2 रिलीज होतोय याची उत्सुकता लागली आहे.
(Heropanti Movie Release Date)
हिरोपंती 2 हा चित्रपट 29 एप्रिल रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार असून,
या चित्रपटाचं दिग्दर्शन अहमेद खान (Director Ahmed Khan) याने केलं आहे.
Web Title :- Heropanti 2 Trailer | heropanti 2 trailer has been released starrer by tiger shroff nawazuddin siddiqui and tara sutaria
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update