Herschelle Gibbs | क्रिकेट विश्वातून मोठी बातमी ! सौरव गांगुली आणि जय शहांवर ‘या’ माजी क्रिकेटपटूने केला खळबळजनक आरोप

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Herschelle Gibbs | क्रिकेट विश्वातून खळबळजनक बातमी समोर आली आहे. दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू हर्षल गिब्जने (Herschelle Gibbs) थेट बीसीसीआयचे (BCCI) अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) आणि सचिव जय शहा (Jay Shah) यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. यामुळे क्रीडा वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

 

काय आहे आरोप?
सौरव गांगुली आणि जय शहा यांनी आपल्याला काश्मीर प्रीमिअर लीगमध्ये (Kashmir Premier League) न खेळण्यासाठी दबाव टाकला असल्याचा आरोप हर्षल गिब्जने केला आहे. जर केपीलमध्ये सहभागी झाला तर भविष्यात भारतीय क्रिकेट बोर्डसोबत (BCCI) कधीच काम करता येणार नसल्याची धमकी दिल्याचंही गिब्जने (Herschelle Gibbs) म्हटलं आहे.

 

हर्षल गिब्जने यानंतर गांगुलीसोबत संपर्क साधला आणि तुम्ही या गोष्टीला राजकीय वळण देत आहात, मी काही राजकारणी नाही.
ही गोष्ट अन्यायकारक असल्याचं सांगितलं त्यानंतर गांगुलीनेही मान्य केल्याचा दावा गिब्जने केला आहे.
मात्र यावर गांगुली किंवा जय शहांकडून कोणतंही स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही.

दरम्यान, हर्षल गिब्ज हा जगातील प्रसिद्ध क्रिकेटपटूंपैकी एक आहे. मात्र त्याने केलेल्या या दाव्यामुळे भारतीय क्रिकेटमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
जय शहा आणि सौरव गांगुली यावर काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

 

Web Title :- Herschelle Gibbs | herschelle gibbs blame to bcci Sourav Ganguly Jay Shah of pressuring him to not play in kashmir indian premier league (IPL)

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Keshav Upadhye | ‘आज बाळासाहेब असते तर त्यांनी उद्धव ठाकरेंनाही तोच सल्ला दिला असता’ – केशव उपाध्ये

 

Pune Metro | पुण्यातील ‘बुधवार पेठ मेट्रो स्टेशनच्या नावात चूक ?; स्थानक ‘या’ नावाने ओळखले जाणार

 

Parbhani Crime | धक्कादायक ! पतीने घेतला गळफास तर पलंगावर पत्नीचा मृतदेह आढळल्याने प्रचंड खळबळ