सर्दी-खोकला सतावतोय ? जाणून घ्या कांद्याच्या ‘या’ 5 सोप्या घरगुती उपचार पद्धती !

पोलीसनामा ऑनलाइन टीम – अनेकजण वातावरणातील बदलामुळं किंवा इतर काही कारणांमुळं सर्दी-खोकल्याच्या समस्येनं ग्रस्त होतात. अनेकांना उपचार करूनही फरक पडत नाही. आपल्या स्वयंपाकघरात अशा अनेक गोष्टी आहेत ज्या सर्दी, खोकला आणि तापासह इतर आजारांवरही रामबाण उपाय आहेत. आज आपण कांद्याबद्दल माहिती घेणार आहोत. याच्या वापरानं सर्दी-खोकला दूर कसा करावा याची माहिती आपण घेणार आहोत.

1) कांद्याचा सिरप – हा सिरप तयार करण्यासाठी कांद्याचा तुकडा एका वाटीत टाका. त्यात मध मिक्स करा. 10 ते 15 तास भिजू द्या. आता तुमचं सिरप तयार आहे.

2) कांद्याची वाफ – कांद्याची वाफ घेतल्यानंतर तुमची रेस्पिरेटरी सिस्टीम चालू होते आणि कफ पातळ होण्यास मदत होते. तुम्हाला गरम पाण्यात कांद्याचे तुकडे टाकावे लागतील. हे पाणी चांगलं उकळून घ्या. वाफ निघायला सुरुवात झाल्यानंतर दोन ते तीन मिनिटे वाफ घ्या.

3) कांद्याचा रस – सर्दी खोकल्यापासून सुटका पाहिजे असेल तर कांद्याचा रस पिऊ देखील शकता. जर तुम्ही कांद्याचा रस पिऊ शकत नसाल तर त्यात लिंबू आणि मध मिक्स करा. या रसाला चव येईल.

4) कांद्याचं सूप – कांद्याचे तुकडे घ्या. त्यात काळी मिर्ची टाका. चवीनुसार मिठ मिसळा. हे मिश्रण पाण्यात टाकून उकळा. त्यानंतर थंड झाल्यानंतर याचं सेवन करा.

5) जेवणात जेवढा शक्य आहे तेवढा कांद्याचा वापर करावा. यासोबत कच्च्या कांद्याचा रस आणि त्यात मध टाकून प्या. कोरडा असो किंवा कफचा प्रत्येक प्रकारचा खोकला यामुळं दूर होतो.

टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल ॲडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये. काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची ॲलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला ॲलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.