Hetero देणार 60 हजार remedesivir चे ‘इंजेक्शन’, महाराष्ट्रातील 166 आणि दिल्लीच्या 53 हॉस्पीटलमध्ये मिळणार औषध

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : हेटेरो हेल्थकेअर लिमिटेड रेमेडिसिव्हिरचे जेनेरिक औषध कोविफॉर उपलब्ध करेल. कंपनीने अशी माहिती दिली की 13 ते 20 जुलै दरम्यान कोविफॉर इंजेक्शनच्या 60 हजार वॉयल वेगवेगळ्या राज्यात उपलब्ध असतील. कोविफॉर रेमेडिसिव्हिर हा या औषधाचा पहिला सर्वसाधारण ब्रँड आहे, ज्याचा उपयोग या आजाराची तीव्र लक्षणे असलेल्या प्रौढ आणि मुलांच्या उपचारांसाठी केला जाऊ शकतो. हे औषध एखाद्या तज्ञांच्या देखरेखीखाली दिले जाईल. रेमेडिसिव्हिर हे अमेरिकन एजन्सी एफडीएने मंजूर केलेले औषध आहे.

महाराष्ट्राला मिळणार सर्वाधिक औषध

महाराष्ट्रातील 166 आणि दिल्लीतील 53 रुग्णालयांमध्ये हे औषध उपलब्ध केले जाणार आहे. तसेच सर्वाधिक नुकसान झालेल्या महाराष्ट्रात या औषधाच्या 12,500 वॉयल देण्यात येतील. यानंतर दिल्लीला 10 हजार, तेलंगणाला 9 हजार, तमिळनाडूला 7500, गुजरातला 6 हजार, कर्नाटकला 3 हजार आणि आंध्र प्रदेशला 2 हजार वॉयल मिळतील.