Hibiscus Flower | केसांची हरवलेली चमक परत आणण्यास मदत करेल जास्वंद; जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – फुलांचा सुवास मनाला शांतता आणि आनंद देतो. त्याचबरोबर हे फुल (Hibiscus Flower) केसांसंबंधित अनेक समस्यांपासून मुक्त होण्यास मदत करते. जास्वंदापासून (Hibiscus Flower) तयार केलेला पॅक लावल्याने केस मुळांपासून मजबूत होतात. डोक्यातील कोंडा, केस गळणे आणि केसांशी संबंधित इतर समस्यांपासून मुक्त होते.

1) केसांना चमक आणा
कोरडे आणि निर्जीव केस पाहणे फारच घाणेरडे दिसते. त्याला व्यवस्थित करणे कठीण जाते. अशा परिस्थितीत जास्वंदाचे फुल केसांना पौष्टिक आणि चमकदार बनवण्यासाठी फायदेशीर मानले जाते.

अशाप्रकारे वापरा
यासाठी, 2 चमचे जास्वंद पावडर कोरफड जेलमध्ये मिसळा आणि केसांना 30 मिनिटे किंवा कोरडे होईपर्यंत लावा. नंतर ते पाण्याने धुवा. हे कोरडेपणा, केस गळणे कमी करेल आणि सुंदर, जाड, मऊ आणि चमकदार बनण्यास मदत करेल.

2) केस वाढण्यासाठी
जास्वंद फुलांमध्ये असणारे अमीनो ॲसिड केसांना पोषण देतात. यामुळे मुळापासून केस मजबूत होतात. केस गळण्याची समस्या दूर होते आणि केस वेगाने वाढू लागतात. याशिवाय हे केसांवर कंडिशनर म्हणून काम करते. अशा प्रकारे केसांचा कोरडेपणा दूर होते आणि ते मऊ होण्यास मदत करते.

अशाप्रकारे वापरा

जास्वंदाची पाच फुले बारीक करून घ्या. नंतर त्यात एक चमचा ऑलिव्ह आणि बदाम तेल मिसळा आणि 30 मिनिटे केसांवर लावा. नंतर कोमट पाण्याने धुवा.

3) डोक्यातील कोंड्यापासून मुक्त व्हा
हंगाम कोणताही असो कोंड्याची समस्या सामान्य झाली आहे. अशा परिस्थितीत, त्यातून मुक्त होण्यासाठी आपण जास्वंदाच्या फुलांचे हेअर पॅक लावू शकता.

अशाप्रकारे वापरा
जास्वंदाची फुले व पाने याची पावडर तयार करा. त्यात 1 चमचा हिना पाउडर आणि 1/2 लिंबाचा रस मिसळा आणि टाळूवर लावा. 30 मिनिटांसाठी ते तसेच सोडा. नंतर पाण्याने धुवा.

4) टक्कल पडण्याची समस्या असल्यास
आजकाल पुरूषांप्रमाणेच स्त्रियांनाही कपाळाजवळ केस कमी होण्याच्या समस्येचा सामना करावा लागत आहे.
अशा परिस्थितीत, टक्कल पडण्यावर उपचार करण्यासाठी जास्वंदाच्या फुलांपासून तयार केलेले मिश्रण वापरले जाऊ शकते.

अशाप्रकारे वापरा
यासाठी 6-7 जास्वंद फुले व पाने बारीक करून बाधित भागावर लावा.
सुमारे 3 तास तसेच ठेवा. त्यानंतर पाण्याने केस धुवा.

Web Titel :- Hibiscus Flower | hibiscus flower for healthy and long hair

Join our Whatsapp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MLA Rohit Pawar | जामखेडच्या सतीशला मिळाले नवे आयुष्य ! आ. रोहित पवार यांच्या माध्यमातून मिळाले मोफत उपचार

Ramdas athavle | …शरद पवार निवडून येणार नाहीत, त्यांना बळीचा बकरा करू नये

Social Media News | धोक्याची घंटा ! तुम्ही सुद्धा सोशल मीडियावर करत असाल ‘हे’ काम, तर 24 तासात डिलिट केले जाईल अकाऊंट