‘त्यांचा’ गांधीजींचा धडा हद्दपार करण्याचा घाट : खासदार चव्हाण

भोकर : पोलीसनामा ऑनलाईन 

माधव मेकेवाड 

शिक्षकांनी विद्यार्थ्यांना पुस्तकातील धडे देण्यासोबतच सशक्त भारत होण्यासाठी सामाजिक व व्यवहारीक जाण शिकवावी. विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच सामाजिक व व्यवहारिक ज्ञानाचे धडे दयावेत.असे आव्हान अशोक चव्हाण यांनी केले.

पंचायत समिती कार्यालयाच्या वतीने आज ( दि २८ सप्टेंबर २०१८ बायपास रोडवरील ओमलॉंन्स भोकर येथे, तालुक्यातील गुणवंत शिक्षकांचा तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा अयोजीत करण्यात आला होता. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून चव्हाण बोलत होते. यावेळी मंचावर आ. अमिताताई चव्हाण, जि. प.आध्यक्षा शांताबाई पा.जवळगावकर , शिक्षण सभापती माधवराव मिसाळे गुरुजी, पाटील, जि. प. सदस्य अनिल पाटील खानापुरकर, प्रकाश पाटील भोसीकर, बाळासाहेब पाटील रावनगावकर , दिवाकर रेड्डी, कृ.ऊ.बा समिती सभापती जगदिष पा. भोसीकर माजी महापौर किशोर स्वामी, पं.स. सभापती झिमाबाई चव्हाण, सुभाष पा.कोळगावकर, गणेश राठोड , गणपत जाधव, अदि मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’99571b01-c3cb-11e8-a595-190cf30bd6ef’]

कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पुजन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. येथे स्वागताचे सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर तालुक्यातील गुणवंत आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील सुमारे ४८ प्राथमिक शिक्षक, मुख्याध्यापक यांचा अशोक चव्हाण व आ. अमिताताई चव्हाण यांच्या हस्ते सपत्नीक शाल, श्रीफळ, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.

पुढे बोलताना चव्हाण म्हणाले की, आज देशात शैक्षणिक परिस्थिती बिकट होत चालली असून काही छुप्या शक्ती ह्या महात्मा गांधी यांचा धडा देखील पाठयपुस्तकातून हद्दपार करण्यासाठी घाट रचत आहेत म्हणून शिक्षकांनीच आता विदयार्थ्यांना भविष्यकाळ
कसा उभा करावा यासाठी चांगले काय ठरवून विदयार्थ्यांना शिकवावे पर्यायाने स्पर्धेच्या युगात टिकला पाहिजे असे आवाहन ही केले.
याप्रसंगी माधवराव मिसळे सर बोलताना म्हणाले कि, शिक्षण अज्ञानांना ज्ञानी बनवतो, अंधाना दृष्टी देतो म्हणून शिक्षकांनी प्रमाणिक, चांगला व चारित्र्यवाण, विद्यार्थी घडवण्यासाठी कृती युक्त शिक्षणाची कास धरावी असे अवाहन केले.

[amazon_link asins=’B01KSXQNLS,B071JWBFDT’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’a4783a29-c3cb-11e8-918e-2532e6935e09′]

जि. प. सदस्य प्रकाश पाटील भोसीकर, सुभाष पाटील कोळगावकर आदिंनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त करून शिक्षकांना शुभेच्छा प्रदान केल्या. कार्यक्रमाच्या वेळी असंख्य शिक्षक, मुख्याध्यापक व शिक्षण प्रेमी नागरिक मोठ्या संख्येने ऊपस्थित होते. यावेळी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.कार्यक्रमाचे प्रास्ताविक गटविकास जी.एल. रामोड यांनी केले तर सुरेख सुत्रसंचलन सहशिक्षक जाधव गोनशेटवाड यांनी केले शेवटी आभार आर.एल. मुधोळकर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वितेसाठी पंचायत समिती शिक्षण विभागाचे विस्तार आधिकारी आर.एल. मुधोळकर, डी.डी. सुपे, एम.जी. वाघमारे, सर्व केंद्रप्रमुख, केंद्रिय मुख्याध्यापक, कार्यालयीन कर्मचारी शेख साहेब, लक्षूमण सुरकार ,महम्मद फजल, शिवाजी हाके,ओंकार पांचाळ, नरसिंग जिङ्डेवार, सुधांशु कांबळे, अमोल नरवाडे, संतोषी पतूलवार, गजानन खुपसे, अनिता गिरी आदिनी प्रयत्न केले.

[amazon_link asins=’B07DNS3KCB,B01D2IBFXM’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’aca6cc8b-c3cb-11e8-b844-530b12f90a1d’]