पश्चिम रेल्वेला हाय अलर्ट : दहशतवादी संघटनांकडून घातपाताची शक्यता

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – पश्चिम रेल्वे विभागातील रेल्वे स्टेशनला हाय अलर्ट देण्यात आला असून या रेल्वे स्टेशनवर दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सध्या पश्चिम रेल्वे विभागातील रेल्वे स्थानकांवर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेशातील रेल्वे स्टेशनला हा इशारा देण्यात आला आहे.

अहमदाबाद, रतलाम, राजकोट या रेलवे स्थानकांवर कडेकोट सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात आली आहे. तसेच विविध माध्यमातून नागरिकांना सतर्क राहण्याचे आव्हान देखील देण्यात येते आहे.आरपीएफ महानिरीक्षक कार्यालयाने पश्चिम रेल्वे अंतर्गत येणाऱ्या सर्व रेल्वे स्थानकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच लांब पल्ल्याच्या गाड्यांवर सुरक्षा रक्षकांकडून करडी नजर ठेवण्यात येते आहे.

मुंबई मधील चर्चगेट येथील महानिरीक्षक कार्यालयाकडून मुंबई, वडोदरा, अहमदाबाद, रतलाम, राजकोट आणि भावनगर येथील आरपीएफ प्रमुखांना पत्र पाठवून सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. या पत्रात नमूद केल्या नुसार, पुलवामा येथे दहशतवादी हल्ला झाल्याने देशातील रेल्वे स्थानकांना लक्ष करून दहशतवादी हल्ला करण्यात येऊ शकतो. तसेच गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या माहिती नुसार गुजरात मधील सार्वजनिक ठिकाणांना देखील दहशतवादी लक्ष करू शकतात.

पुलवामा दहशतवादी हल्ल्याची यंत्रणा सांभाळणारा हैदराबाद येथील माणूस हा हल्ला घडवू शकतो अशी माहिती भारतीय गुप्तचर यंत्रणे कडून देण्यात आली आहे. त्यामुळे देशातील सर्वच रेल्वे स्थानकांवर सुरक्षेची कडक निगराणी ठेवण्यात आली आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like