पोलिओच्या लसीतच पोलिओ व्हायरस; महाराष्ट्रात हायअलर्ट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

भारत देश पोलिओमुक्त झाला आहे अशी घोषणा जरी झाली असली तरी एका घटनेमुळे खरंच भारत पोलिओमुक्त झालाय ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. गाझियाबाद येथील बायोमेड कंपनीद्वारे तयार करण्यात आलेल्या लसींमध्ये टाइप-२ पोलिओ व्हायरस आढळून आल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे देशावर पुन्हा पोलिओ संकट येणार की काय अशी भीती आहे.

बायोमेड या कंपनीच्या या व्हायरसयुक्त लसी मुख्यत्वे महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशात वापरण्यात आल्याचं समोर आलं असून दोन्ही राज्यांना अलर्ट केलं असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे. आता पोलिओच्या लसीमधूनच पोलिओचा व्हायरस पसरत असेल तर नक्कीच ही धोकादायक बाब आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’efffdc99-c3c0-11e8-845c-7ffdbde548ff’]

उत्तर प्रदेशात उघड झाली घटना

पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत उत्तर प्रदेशात बायोमेड कंपनीकडून लस पुरवण्यात येतात. राज्यातील काही मुलांच्या विष्ठेमध्ये पोलिओ व्हायरसचे लक्षण आढळून आल्यानंतर बायोमेड कंपनीच्या लसींची वैद्यकीय चाचणी घेण्यात आली. अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, बायोमेड कंपनीच्या लसींमध्ये टाइप-२ पोलिओ व्हायरसचे अस्तित्त्व असल्याचं निष्पन्न झालं आहे. बायोमेड कंपनीविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला असून कंपनीच्या संचालकालाही अटक करण्यात आली आहे. बायोमेड कंपनीची लस उत्तर प्रदेश राज्यासह महाराष्ट्रातही वापरली जात असल्याची धक्कादायक बाब उघड झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

[amazon_link asins=’B00FRCNR6U,B073JYDK7P’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’5ac0a8ce-c3c1-11e8-95e1-efe500cdb8eb’]

पोलिओ विषयी थोडेसे

जागतिक आरोग्य संघटनेने १९९८ सालापासून ‘पल्स पोलिओ’ची मोहीम सुरू केली. दरवर्षी जानेवारी व फेब्रुवारीत ‘पोलिओ रविवार’ साजरे केले गेले. लोकांच्या घरोघरी जाऊन ‘पोलिओ रविवार’च्या नंतरच्या आठवड्यात ५ वर्षांखालील मुलांना पोलिओ डोस पाजले गेले. अमिताभ बच्चन, महम्मद कैफ इत्यादी व्यक्तींना हाताशी धरून दूरचित्रवाणीच्या माध्यमातून लोकांना भावनिक आवाहन केले गेले आणि लोकजागृती सुरू ठेवली. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार आफ्रिका खंडही पोलिओ निर्मूलनाच्या मार्गावर आहे. याचमुळे जगातून पोलिओ हटवण्याचा प्रयत्न सुरु आहे.

२७ मार्च २०११ साली जागतिक आरोग्य संघटनेने भारताला पोलिओमुक्त देश म्हणून प्रशस्तीपत्र प्रदान केले . यावेळी जागतिक संघटनेच्या यादीत भारताबरोबरच नेपाळ, बांग्लादेश, श्रीलंका, ब्रह्मदेश या देशांना देखील पोलिओमुक्त देश म्हणून प्रशस्तिपत्रक प्रदान करण्यात आले होते.

पोलिओ निर्मूलनासाठी संशोधन करणारे रोलँड सटर, जेकब जॉन बहल, मोहम्मद अहमद व जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य डॉ. नाता या सर्वानी एक दृष्टी ठेवून त्या दिशेने संशोधन केले व या संशोधनाच्या जोरावर काही निर्णय घेतले. त्याचेच फलित म्हणून भारताला पोलिओमुक्त म्हणून घोषित करण्यात आले.

[amazon_link asins=’B07BHFT3VQ,B079GXD2WB’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’4b50a1c8-c3c1-11e8-b2b0-51dcb747dd10′]