High Blood Pressure | उच्च रक्तदाब असलेल्या लोकांसाठी ‘या’ पध्दतीनं झोपणे फायदेशीर ठरते, रक्तदाब नियंत्रणात राहतो; जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – उच्च रक्तदाबाची (High Blood Pressure) समस्या हा हृदयरोगाचा (Heart Disease) प्रमुख घटक मानला जातो. सतत उच्च रक्तदाब (High BP) राहिल्याने हृदयविकाराचा झटका (Heart Attack) येऊ शकतो. उच्च रक्तदाब, ज्याला हायपरटेन्शन (Hypertension) म्हणून देखील ओळखले जाते, ते नियंत्रणात ठेवण्यासाठी आहार आणि राहणीमान बदलण्याकडे लक्ष देणे आवश्यक मानले जाते. या परिस्थितीकडे दुर्लक्ष केल्यास गंभीर समस्या उद्भवू शकतात (High Blood Pressure).

 

ज्या लोकांना हायपरटेन्शनची समस्या आहे, अशा लोकांमध्ये ते आयुष्यभर टिकू शकते, असं आरोग्य तज्ज्ञ सांगतात. उच्च रक्तदाब (High Blood Pressure) फक्त नियंत्रित केला जाऊ शकतो, म्हणून रुग्णांनी स्थिती नियंत्रित करण्यासाठी सर्व प्रयत्न करत राहिले पाहिजे (Best Sleeping Position For High Blood Pressure Patients).

 

काही अभ्यास असे सूचित करतात की उच्च रक्तदाबाची स्थिती नियंत्रित करण्यात आपल्या झोपेच्या पद्धतीची महत्त्वपूर्ण भूमिका असू शकते.

 

हायपरटेन्शनबद्दल जाणून घ्या (Know About Hypertension) :
हायपरटेन्शनवर नियंत्रण कसे ठेवावे हे जाणून घेण्यापूर्वी, शेवटी समस्या काय आहे हे जाणून घेणे आवश्यक आहे.आरोग्य तज्ञांच्या मते रक्तवाहिन्यांमध्ये दीर्घ काळ वाढलेल्या रक्तदाबाची स्थिती उच्च रक्तदाब मानली जाते. आपले हृदय किती रक्त पंप करते आणि रक्तवाहिन्यांमधील रक्त प्रवाहास प्रतिकार करण्याचे प्रमाण किती आहे, यावर आधारित रक्तदाब पातळी निश्चित केली जाते. याची नियमित तपासणी करून घ्यावी.

पुरेशी झोप आवश्यक (Enough Sleep Required) :
दररोज रात्री ६-८ तास झोप घेणे आवश्यक ठरते. जर आपल्याला हायपरटेन्शनचा त्रास असेल तर या गोष्टीची विशेष काळजी घेतली पाहिजे. ज्या लोकांना झोपेचे विकार (Sleep Disorders) आहेत किंवा अखंडित झोप घेण्यात अडचण येते त्यांना उच्च रक्तदाब होण्याचा धोका जास्त असू शकतो. जाणून घेऊयात या समस्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी झोपण्याच्या पद्धतीचे योगदान काय मानले जाते?

 

झोपण्याची ही पद्धत फायदेशीर (This Method Of Sleeping Is Beneficial) :
झोपण्याच्या पद्धतीत रक्तदाबाच्या पातळीवर विशेष फरक असतो. उच्च रक्तदाब नियंत्रित (High BP Control) करण्यासाठी पोटावर झोपण्याची सवय खूप उपयुक्त ठरू शकते, असे संशोधकांना अभ्यासात आढळले आहे. अशा प्रकारे झोपणे रक्तवाहिन्यांवरील दबाव कमी करण्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. स्लीप एपनियासारख्या (Sleep Apnea) समस्यांमध्येही अशा प्रकारे झोपण्याच्या सवयीचा फायदा होतो.

 

उपाययोजना आवश्यक (Measures Required) :
उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी, झोपेची पद्धत आणि एकूण कालावधी या दोन्हीकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. दररोज झोप पूर्ण करून आहार संतुलित ठेवण्यावर भर द्यावा, म्हणजे रक्तदाब नियंत्रित करता येईल. याशिवाय रक्तदाबाचा त्रास असणार्‍यांनी सोडियमचे सेवन कमी करण्याबरोबरच दैनंदिन व्यायामाची सवयही लाऊन घ्यायला हवी.

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :-  High Blood Pressure | best sleeping position for high blood pressure patients how sleep can lower bp

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Blood Sugar Level Control | भेंडीच्या पाण्याने ब्लड शुगर कंट्रोल ! डायबिटीजच्या रूग्णांनी दररोज सकाळी करावे ‘हे’ एक काम

 

Superfoods for Weight Loss | लठ्ठपणा कमी करण्यासाठी मदत करू शकतात ‘हे’ 7 सुपरफूड्स, तात्काळ करा डाएटमध्ये समावेश; जाणून घ्या

 

PM Kisan Yojana | शेतकऱ्यांसाठी खूशखबर ! मोदी सरकार ‘या’ दिवशी PM किसानचा 11 वा हप्ता जाहीर करणार; जाणून घ्या