High Blood Pressure : हाय ब्लड प्रेशरच्या 2 वॉर्निंग साइन, डोळे आणि चेहर्‍यावर ओळखा ‘या’ खुणा

पोलीसनामा ऑनलाइन टीम – हाय ब्लड प्रेशर हळु-हळु व्यक्तीला मृत्यूच्या दरवाजापर्यंत घेऊन जातो, यासाठी या आजाराला सायलेंट किलर म्हणतात. हाय ब्लड प्रेशरची लक्षणे लोकांना चांगल्याप्रकारे माहित आहेत. परंतु, तुम्हाला याची दोन अशी लक्षणे माहित आहेत का ज्यामध्ये व्यक्तीचा चेहरा पाहून आजाराची माहिती मिळू शकते.

हाय ब्लड प्रेशर म्हणजे हायपरटेन्शनचे कनेक्शन आर्टिरियल्स नावाच्या धमण्यांशी आहे. आर्टिरियल्स आपल्या शरीरातील ब्लड फ्लो नियंत्रित करण्याचे काम करतात. जेव्हा त्या पातळ होतात तेव्हा व्यक्तीचे हृदय रक्त पम्प करण्यासाठी जास्त काम करते. सोबतच नसांमध्ये सुद्धा प्रेशर वाढते.

वेबएमडीच्या रिपोर्टनुसार, डोकं गरगरणे, जीव घाबरणे, घाम येणे आणि झोप न येणे ही हाय ब्लड प्रेशरची लक्षणे आहेत. परंतु ही लक्षणे इतकी कॉमन आहेत की, याची अनेक दुसरी कारणे सुद्धा असू शकतात.

अमेरिकन हार्ट असोसिएशननुसार, डोळ्यांमध्ये ब्लड स्पॉट ज्यास सब्सकंजक्टिव्हल हॅमरेज म्हटले जाते, हाय ब्लड प्रेशरची वॉर्निंग साइन असू शकते. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, डोळ्यात ब्लड स्पॉट डायबिटीज आणि हाय ब्लड प्रेशरमध्ये मोठे कॉमन लक्षण आहे. कदाचित डोळ्यांचे डॉक्टर अनट्रीटेड हाय ब्लड प्रेशरमुळे ऑप्टिक नर्व्सच्या नुकसानीचा शोध घेऊ शकतात.

अमेरिकन हार्ट असोसिएशननुसार, चेहर्‍यावरील लालसरपणाचे सुद्धा हाय ब्लड प्रेशरशी थेट कनेक्शन असू शकते. फेस फ्लशिंगची ही समस्या त्यावेळी होते जेव्हा चेहर्‍याच्या रक्तवाहिन्या पातळ होतात. असे अप्रत्यक्ष प्रकारे होऊ शकते किंवा सूर्यप्रकाश, थंड हवामान, स्पायसी फूड, हवा, गरम पेय किंवा स्किन केयर प्रॉडक्ट यास ट्रिगर करू शकतात.

याशिवाय इमोशनल स्ट्रेस, हीट किंवा गरम पाण्याचा संपर्क, दारूचे अति सेवन आणि ब्लड प्रेशर वाढवणारी एक्सरसाइज सुद्धा फेशियल फ्लशिंग वाढवू शकते. फेशियल फ्लशिंगची ही समस्या तेव्हा होऊ शकते जेव्हा शरीराच ब्लड प्रेशर सामान्यच्या वर असेल.

हे लक्षात ठेवा
* गरजेपेक्षा जास्त मीठ खाण्याने ब्लड प्रेशर आणि किडनी दोन्ही खराब होऊ शकते.
* मीठ कमी केल्याने ब्लड प्रेशर कंट्रोल केले जाऊ शकते.
* परंतु केवळ मीठ कमी करण्याने हायपरटेन्शन कमी होत नाही. ब्लड प्रेशर नियंत्रित ठेवण्यासाठी योग्य जीवनशैली अवलंबली पाहिजे.