High Blood Pressure | ब्लड प्रेशर कंट्रोल करू शकते का सैंधव मीठ? जाणून घ्या आणखी घरगुती उपाय

पोलीसनामा ऑनलाइन टीम – High Blood Pressure | ब्लड प्रेशर (Blood pressure) हा एक सामान्य आजार झाला आहे. यामुळे सर्व वयोगटातील लोक त्रस्त आहेत. तणावावर वेळीच नियंत्रण ठेवले नाही तर तो आजाराचे रूप घेतो. या आजाराला ब्लड प्रेशर किंवा हायपरटेन्शन (Hypertension) म्हणतात. रक्तदाबावर योग्य वेळी उपचार न केल्यास हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोक सारख्या (Heart Attack And Stroke) गंभीर आणि जीवघेण्या स्थितीचा धोका वाढतो. (High Blood Pressure)

 

हाय ब्लड प्रेशरच्या रुग्णांना शुगर, पाय सुजणे, डोळे सुजणे यासारख्या समस्या असू शकतात. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या अहवालानुसार, भारतात दरवर्षी 20 कोटींहून अधिक लोकांना हाय ब्लड प्रेशरचा त्रास होतो.

 

कानपूरच्या द गॅस्ट्रो-लिव्हर हॉस्पिटलचे व्ही. के. मिश्रा सांगतात की, हाय ब्लड प्रेशरबद्दल अनेक गैरसमज आहेत. याबाबत बोलताना डॉ. मिश्रा म्हणाले की, ब्लड शुगरप्रमाणेच हाय ब्लड प्रेशर देखील काही प्रमाणात अनुवांशिक असू शकतो. (High Blood Pressure)

 

पण यामुळे हा आजार असेलच असे नाही. बदलत्या जीवनशैलीमुळे ब्लड प्रेशरची समस्या वाढली आहे. जर जीवनशैली आणि खाण्याच्या सवयी वाईट असतील तर ब्लड प्रेशर वाढण्याची शक्यता वाढते. ब्लड प्रेशर संबंधित काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेवूयात –

1. सैंधव मीठ (Sandhav Salt) :
थकज च्या म्हणण्यानुसार, दिवसभरात फक्त 5 ग्रॅम मीठ वापरावे. पिझ्झा, सूप, चिप्स आणि अन्य पॅकेज्ड फूडमध्ये मीठ जास्त असते. लोक वेगवेगळ्या प्रकारचे मीठ वापरून स्वतःला निरोगी ठेवण्यावर विश्वास ठेवतात.

 

सैंधव मीठ शरीरातील सेरोटोनिन आणि मेलाटोनिन हार्मोन्सचे संतुलन राखण्यास मदत करते, ज्यामुळे तणाव येत नाही.
कारण सोडियम क्लोराईड, आयोडीन, लिथियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटॅशियम याशिवाय अनेक महत्त्वाचे घटक सैंधव मीठात आढळतात.

 

2. मनुका (Raisins) :
मनुका आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यातील पोटॅशियम शरीरातील सोडियम नियंत्रित करते, ज्यामुळे ब्लड प्रेशर सुद्धा नियंत्रित राहते.
यासाठी रात्री झोपण्यापूर्वी मनुके पाण्यात भिजत ठेवा, नंतर सकाळी उठून रिकाम्या पोटी त्यांचे सेवन करा.

 

3. वाईन (Wine) सेवन करा :
वाईन आरोग्यासाठी फायदेशीर आहे. पण अल्कोहोलच्या सेवनाने हाय ब्लड प्रेशरची समस्या वाढू शकते.
आरोग्य तज्ञांच्या मते, अल्कोहोलमध्ये कॅलरीज जास्त असतात. ज्यामुळे वजन वाढू शकते. वजन वाढल्याने हाय ब्लड प्रेशरचा धोका वाढतो.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- High Blood Pressure | high blood pressure rock salt can be useful in controlling hyper tension know other home remedies

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Daibetes – Milk | डायबिटीजमध्ये दूध प्यायल्याने रुग्णांची ब्लड शुगर वाढू शकते का? जाणून घ्या काय आहे सत्य

Winter Care | हिवाळ्यात मुलांची घ्या विशेष काळजी, जाणून घ्या कसे ठेवावे गरम आणि आजारांपासून सुरक्षित

Health Tips | जेवल्यानंतर ताबडतोब झोपण्याची सवय आहे का? मग व्हा सावध! होऊ शकतात हे गंभीर आजार