High BP | किडनीमध्ये समस्या असेल तरी सुद्धा होऊ शकते ‘हाय ब्लड प्रेशर’, जाणून घ्या ‘बीपी’ हाय होण्याची 5 कारणे

पोलीसनामा ऑनलाइन टीम – High BP | किडनी (Kidney) हा आपल्या शरीराचा एक महत्त्वाचा भाग आहे जो रक्त शुद्ध करतो आणि शरीरातील विषारी पदार्थ (Toxic Substances) काढून टाकतो. किडनी आपल्या शरीरातील टाकाऊ पदार्थ आणि अतिरिक्त पाणी लघवीद्वारे काढून टाकते. किडनीच्या कार्याबद्दल बोलायचे तर, तिचे पहिले कार्य म्हणजे लघवी तयार करणे आणि रक्त शुद्ध करणे. आपली किडनी शरीरातील टाकाऊ पदार्थ आणि इतर रसायने काढून टाकते ज्याची शरीराला गरज नसते (High BP).

 

मूत्रपिंड विविध हार्मोन्स रेनिन, अँजिओटेन्सिन, अल्डोस्टेरॉन, प्रोस्टाग्लँडिन (Angiotensin, Aldosterone, Prostaglandin) तयार करते जे शरीरातील पाणी (Water) आणि मीठ (Salt) नियंत्रित करण्यास मदत करतात. रक्तदाब नियंत्रणात (Blood Pressure Control) किडनी महत्त्वाची भूमिका बजावते. किडनी निकामी झाल्यामुळे हार्मोन्स तयार होण्यात गडबड होते.

 

मीठ आणि पाण्याचे नियमन बिघडल्यास हाय ब्लड प्रेशर (High Blood Pressure) होऊ शकते. ब्लड प्रेशर अचानक वाढल्याने हृदयविकाराचा झटका (Heart Attack), स्ट्रोक (Stroke), मेंदूचे नुकसान (Brain Damage) अशा अनेक गंभीर समस्या उद्भवू शकतात (High BP).

 

ज्या लोकांची बीपी लेव्हल (BP Level) सतत 120/80 mmHg पेक्षा जास्त असते, त्यांनी ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. रक्तदाब वाढणे आणि कमी होणे या दोन्ही गोष्टी आरोग्यास हानी पोहोचवू शकतात. उच्च रक्तदाबामुळे शरीराच्या अवयवांचे नुकसान होऊ शकते. हाय ब्लड प्रेशरची कारणे जाणून घेवूयात (Let’s Know The Causes Of High Blood Pressure)…

1. किडनीची समस्या वाढवू शकते बीपी (BP Can Increase Kidney Problems) :
मूत्रपिंडाच्या समस्यांमुळे रक्तदाब वाढू शकतो. मूत्रपिंडाच्या आजारांमुळे उच्च रक्तदाब होऊ शकतो. जर एखाद्या व्यक्तीला मूत्रपिंडाचा त्रास असेल तर त्याचा रक्तदाब वाढू शकतो.

 

2. तणाव वाढवू शकतो बीपी (BP Can Increase Stress) :
तणावामुळे रक्तदाब वाढतो. धकाधकीच्या जीवनात ताणतणाव सामान्य आहे, परंतु अति तणावामुळे रक्तदाबाची पातळी (Blood Pressure Level) झपाट्याने वाढते. बीपी नियंत्रणात ठेवायचा असेल तर तणाव कमी करा.

 

3. सोडियमचे जास्त सेवन (Excessive Sodium Intake) :
जास्त प्रमाणात सोडियम (Sodium) घेतल्याने रक्तदाब वाढू शकतो. ज्या लोकांना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे,
त्यांनी जेवणात मिठाचे सेवन कमी करावे. तळलेले, भाजलेले अन्न, आणि मीठ (Fried Food, Baked Foods and Salt)
उच्च रक्तदाबाच्या रुग्णांचा रक्तदाब वाढवू शकते.

 

4. झोपेच्या कमतरतेमुळे वाढू शकतो रक्तदाब (Lack Of Sleep Can Increase Blood Pressure) :
ज्या लोकांना उच्च रक्तदाब आहे, अशा लोकांनी रात्री 7-8 तास झोपावे. कमी झोपेमुळे तुमचा रक्तदाब वाढू शकतो.

 

5. अमली पदार्थ वाढवू शकतात रक्तदाब (Drugs Can Raise Blood Pressure) :
गुटखा, सिगारेट, दारू (Gutka, Cigarettes, Alcohol) यांसारख्या मादक पदार्थांचे सेवन केल्यास रक्तदाब वाढू शकतो.
ज्या लोकांचा बीपी जास्त आहे, अशा लोकांनी नशा करणे टाळावे.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- High BP | know the 5 reasons and symptoms of high blood pressure

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Diabetes Control | डायबिटीजच्या रूग्णांनी झोपण्यापूर्वी करावी ‘ही’ 5 कामे, शुगर राहील कंट्रोल

 

PMC Property Tax | पुणे महापालिकेच्या मिळकत कर विभागाच्या कारवाई नंतर दिवसात 1 कोटी 86 लाख वसुल

 

Pune Crime | येरवडा परिसरातील जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेच्या पोलिसांचा छापा; 8 जणांवर कारवाई