High Cholesterol | कोलेस्ट्रॉल वाढण्याचे संकेत देतात शरीराचे ‘हे’ 3 अवयव, दिसू लागतात ‘हे’ बदल; जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – खराब जीवनशैलीमुळे (Bad Lifestyle) उच्च कोलेस्ट्रॉल (High Cholesterol) वाढण्याची समस्या सामान्य झाली आहे. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न केले जातात, परंतु कोलेस्ट्रॉल वाढल्याने शरीरात कोणते बदल होतात हे फार कमी लोकांना माहिती असेल. कोलेस्ट्रॉल वाढल्यामुळे (High Cholesterol) शरीराच्या कोणत्या 3 भागात बदल होतात.

 

कोलेस्ट्रॉलचे दोन प्रकार आहेत (There Are Two Types Of Cholesterol)
वाढलेल्या कोलेस्ट्रॉलच्या मुख्य लक्षणांमध्ये त्वचेतील बदलांचा समावेश होतो. कोलेस्ट्रॉल शरीराच्या सर्व अवयवांमध्ये रक्त वाहून नेण्याचे काम करतात. हे दोन प्रकारचे असतात, लो डेन्सिटी लिपोप्रोटीनला (Low Density Lipoprotein) बॅड कोलेस्ट्रॉल (Bad Cholesterol) आणि हाय डेन्सिटी लिपोप्रोटीनला (High Density Lipoprotein) गुड कोलेस्ट्रॉल (Good Cholesterol) म्हणतात. बॅड कोलेस्ट्रॉलमुळे रक्तवाहिन्यांमध्ये प्लेक जमा होते, ज्यामुळे हृदयविकाराचा झटका (Heart Attack) आणि स्ट्रोकचा (Stroke) धोका वाढतो.

 

या कारणांमुळे कोलेस्ट्रॉल वाढते (These Causes Cholesterol To Rise)

अन्नामध्ये जास्त प्रमाणात ट्रान्स फॅट आणि कोलेस्ट्रॉलयुक्त पदार्थांचे सेवन केल्याने

लठ्ठपणामुळे

धूम्रपान केल्याने

काही औषधांच्या सेवनामुळे

उच्च कोलेस्ट्रॉलची लक्षणे (Symptoms Of High Cholesterol)

1. कोलेस्ट्रॉल वाढल्याने डोळ्यांमध्येही बदल होऊ लागतात. असे मानले जाते की जेव्हा कोलेस्ट्रॉल वाढते तेव्हा रुग्णांना डोळ्याच्या कॉर्नियाच्या बाहेरील भागाच्या वर किंवा खाली निळ्या किंवा पांढर्‍या घुमटासारखे काहीतरी दिसते. अशा स्थितीत तुम्ही तुमच्या कोलेस्ट्रॉलची चाचणी नक्की करून घ्या (High Cholesterol).

 

2. जर तुमच्या त्वचेचा रंग बदलू लागला असेल तर थोडे सावध व्हा कारण हे देखील कोलेस्ट्रॉल वाढण्याचे लक्षण आहे.

 

3. जर हात दुखत असतील तर तुम्ही लक्ष द्यावे. असे मानले जाते की वारंवार हात दुखणे हे योग्य लक्षण नाही.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- High Cholesterol | high cholesterol symptoms hands skin eyes change know everything

 

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Sun Poisoning | उन्हाळ्यात उन्हामुळे होऊ शकते ‘सन पॉयझनिंग’, जाणून घ्या याची लक्षणे आणि बचाव

 

Breasts Sagging ची समस्या दूर करण्यासाठी 5 सोप्या आणि प्रभावी पद्धती

 

Knee Pain | तुमचे गुडघे आणि सांध्यांमध्ये वेदना होतात का? शास्त्रज्ञांनी शोधली नैसर्गिक पद्धत; जाणून घ्या