High Cholesterol | पायांवर दिसत असतील हाय कोलेस्ट्रॉलचे ‘हे’ संकेत तर दुर्लक्ष करण्याची कधीही करू नका चूक; जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – हाय कोलेस्ट्रॉल (High Cholesterol) ही आजच्या काळात एक सामान्य समस्या आहे आणि ही समस्या अनेक लोकांमध्ये दिसून येते. कोलेस्टेरॉलची पातळी (Cholesterol Level) वाढल्याने हृदयविकार आणि स्ट्रोकचा (Heart Disease And Stroke) धोका वाढतो. 2018 च्या अहवालानुसार, भारतात हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आजाराने मरणार्‍या लोकांच्या दरात 34 टक्के वाढ झाली आहे. मृत्यू दर 155.7 वरून 209.19 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये हाय कोलेस्टेरॉल (High Cholesterol) असलेल्या लोकांची संख्या खूप जास्त होती.

 

हाय कोलेस्टेरॉलवर नियंत्रण (High Cholesterol Control) ठेवण्यासाठी चांगल्या आहारासोबतच कोलेस्टेरॉलची वेळोवेळी तपासणी करावी लागते. जेणेकरून कोलेस्टेरॉल वेळीच नियंत्रणात (High Cholesterol) आणून आरोग्य धोके कमी करता येतील. अलीकडेच एका तज्ज्ञाने हाय कोलेस्टेरॉलची काही लक्षणे (High Cholesterol Symptoms) सांगितली आहेत जी पायात दिसतात. या लक्षणांकडे दुर्लक्ष करण्याची चूक अजिबात करू नये. जर तुम्हाला ही लक्षणे दिसली तर तुम्ही ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

 

कोलेस्ट्रॉल म्हणजे काय (What Is Cholesterol)
कोलेस्टेरॉल हा मेणासारखा पदार्थ आहे जो लिव्हरमध्ये तयार होतो. तो दोन प्रकारचा असतो गुड कोलेस्टेरॉल (Good Cholesterol) म्हणजे हाय डेंसिटी लिपोप्रोटीन (एचडीएल) आणि लो डेंसिटी लिपोप्रोटीन म्हणजे बॅड कोलेस्ट्रॉल (Bad Cholesterol) (एलडीएल). एलडीएल कोलेस्टेरॉल शरीरासाठी धोकादायक आहे. याच्या वाढीमुळे शरीरात अनेक समस्या उद्भवू लागतात. हाय कोलेस्टेरॉलची स्थिती पाहून डॉक्टरांकडून उपचार केले जातात.

निरोगी व्यक्तीसाठी कोलेस्टेरॉलचे प्रमाण (Cholesterol Levels For Healthy Person) :

एकूण कोलेस्टेरॉल : 200- 239 mg/dL पेक्षा कमी

HDL : 60 mg/dL पेक्षा जास्त

LDL : 100 mg/dL पेक्षा कमी

 

पायांमध्ये दिसतात हाय कोलेस्टेरॉलची ही लक्षणे (These Symptoms Of High Cholesterol Appear In Feet)

ओलिओ लुसो येथील वैद्यकीय संचालक डॉ. मोनिका वासरमन (Dr. Monika Wassermann) यांच्या मते, स्थिती धोकादायक पातळीपर्यंत पोहोचेपर्यंत हाय कोलेस्टेरॉलची लक्षणे सहसा दिसत नाहीत. हाय कोलेस्टेरॉलची पातळी ओळखण्यासाठी रक्त तपासणी करणे आवश्यक आहे. जेव्हा रक्तातील कोलेस्टेरॉलची पातळी खूप जास्त होते, तेव्हा काही लक्षणे पायांमध्ये दिसू लागतात.

 

डॉक्टर मोनिका पुढे सांगतात की, जर एखाद्या व्यक्तीच्या पायात ही लक्षणे दिसली तर त्याकडे दुर्लक्ष करू नये कारण ही लक्षणे शरीरातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण दर्शवतात. पाय आणि बोटे सुन्न होणे आणि पिवळी नखे हे देखील हाय कोलेस्टेरॉलचे लक्षण आहे. याचा अर्थ रक्तवाहिन्या आणि रक्तवाहिन्यांमध्ये खराब कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढले आहे.

 

ही देखील हाय कोलेस्ट्रॉलची लक्षणे (These Are Also Symptoms Of High Cholesterol)

1. छाती दुखणे

2. लोअर बॉडी थंड पडणे

3. वारंवार श्वास लागणे

4. मळमळ

5. थकवा जाणवणे

6. ब्लड प्रेशर वाढणे

ताबडतोब डॉक्टरांना दाखवा (See A Doctor Immediately)
डॉक्टर मोनिकाच्या म्हणण्यानुसार, जर कोणाला यापैकी कोणतीही लक्षणे शरीरात जाणवत असतील तर त्यांनी ताबडतोब डॉक्टरांना दाखवावे. हाय कोलेस्ट्रॉलचा धोका असलेल्या लोकांनी रेड मीट, प्रोसेस्ड मीट, बेक्ड फूड, फ्राईड फूड खाणे टाळावे. यासोबत ऑईली फिश (मॅकरेल आणि सॅल्मन), ब्राऊन राईस, ब्राऊन ब्रेड, ब्राऊन पास्ता, नट, बिया, फळे आणि भाज्या आहारात घ्याव्यात.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- High Cholesterol | high cholesterol warning signs in your body legs feet nails which lead to heart attack stroke

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

30 Plus Skin Care | वाढत्या वयातही तुम्हाला नवीन आणि सुंदर दिसायचं असेल तर फॉलो करा ‘या’ टिप्स; जाणून घ्या

 

Benefits Of Peach | पीचच्या खाण्याने अ‍ॅलर्जीपासून ते बद्धकोष्ठतेपर्यंत आजार होतील दूर; जाणून घ्या

 

Diabetes Problems | सावधान ! आरोग्यासाठी खुपच धोकादायक ठरू शकतं डायबिटीजला हलक्यात घेणं, जाणून घ्या तज्ञ काय सांगतात