High Cholesterol Sign on skin | रक्तात घाणेरडे कोलेस्ट्रॉल वाढल्याने त्वचेवर दिसू लागतात ‘ही’ 4 लक्षणे, अजिबात करू नका दुर्लक्ष

पोलीसनामा ऑनलाइन टीम – High Cholesterol Sign on skin | हाय कोलेस्टेरॉल (High cholesterol) तेव्हा होते जेव्हा रक्तात कोलेस्टेरॉल नावाचा फॅटी पदार्थ जास्त असतो. हे प्रामुख्याने चरबीयुक्त पदार्थ खाणे, पुरेसा व्यायाम न करणे, वजन जास्त असणे, धूम्रपान आणि दारू पिणे यामुळे होते. अनेक बाबतीत ते अनुवांशिक देखील आहे. (High Cholesterol Sign on skin)

 

खूप जास्त कोलेस्टेरॉल तुमच्या रक्तवाहिन्या ब्लॉक करू शकते. यामुळे हृदयाशी संबंधित आजार किंवा स्ट्रोक होण्याची शक्यता वाढते. हाय कोलेस्टेरॉल घातक ठरू शकते आणि अचानक मृत्यूचा धोका देखील असतो.

 

हाय कोलेस्टेरॉलची कोणतीही लक्षणे नाहीत. परंतु रक्तातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण साध्या रक्त तपासणीद्वारे तपासले जाऊ शकते.

 

डॉ. रिंकी कपूर, कन्सल्टंट डर्मेटोलॉजिस्ट, कॉस्मेटिक डर्मेटोलॉजिस्ट आणि डर्मेटो-सर्जन, द एस्थेटिक क्लिनिक, सांगतात की, जर तुम्ही तुमच्या आरोग्याकडे नीट लक्ष दिले तर तुम्हाला दिसेल की निसर्ग तुम्हाला हाय कोलेस्ट्रॉलची सूक्ष्म संकेत दाखवतो. जे तुम्ही तुमच्या त्वचेवर सहज पाहू शकता.

 

डोळ्यांच्या त्वचेजवळ दिसतात हे बदल
जेव्हा व्यक्तीच्या शरीरात कोलेस्टेरॉलचे प्रमाण जास्त असते, तेव्हा डोळ्यांमध्ये काही बदल दिसून येतात. या स्थितीला जँथेल्मा म्हणतात. यामध्ये डोळ्यांच्या कोपर्‍याभोवती पिवळ्या आणि केशरी रंगाचा मेणासारखा थर जमू लागतो. हे त्वचेखाली कोलेस्टेरॉल जमा झाल्यामुळे होते. (High Cholesterol Sign on skin)

 

पाय आणि तळव्यांवर दिसतो हा परिणाम
डोळ्यांच्या त्वचेची स्थिती जँथोल्मा सारखीच असते. यामध्ये, पायांच्या खालच्या त्वचेवर आणि तळव्याच्या मागील भागावर पिवळसर मेणाचा थर जमा होऊ लागतो. तुमचे कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवल्यास त्यातून सुटका मिळू शकते.

हाय कोलेस्टेरॉलमुळे सोरायसिसचा धोका
ताज्या संशोधनात सोरायसिस आणि हाय कोलेस्ट्रॉल लेव्हल यांच्यात संबंध आढळून आला आहे. याला हायपरलिपिडेमिया म्हणतात. या शब्द अनेक विकारांचा समावेश करतो ज्यामुळे तुमच्या रक्तातील अतिरिक्त चरबी, ज्याला लिपिड देखील म्हणतात.

 

हायपरलिपिडेमिया उपचार करण्यायोग्य आहे, परंतु ही अनेकदा आयुष्यभर चालणारी स्थिती असते. संतुलित जीवनशैली यापासून मुक्त होण्यास मदत करू शकते.

 

त्वचेच्या रंगात बदल आणि कोरडेपणा
हाय कोलेस्टेरॉलची लेव्हल त्वचेखालील रक्त प्रवाह कमी करू शकतो यामुळे ही लक्षणे दिसतात.
त्वचेच्या पेशींना पुरेसे पोषण मिळत नाही आणि त्वचेचा रंग बदलतो.
तुम्ही जास्त वेळ उभे राहिल्यास तुमचे पाय जांभळे होऊ शकतात. तुमचे पाय उंचावर असल्यास त्वचा पिवळी होऊ शकते.

 

डॉक्टरांचा सल्ला
रिंकी कपूर यांनी हाय कोलेस्टेरॉलचा त्रास असलेल्या रुग्णांना सल्ला देताना सांगितले
की, आरोग्याची चांगली काळजी घेतल्यास कोलेस्टेरॉलची लेव्हल कंट्रोल राहते आणि त्वचेच्या समस्या टाळण्यासही मदत होते.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- High Cholesterol Sign on skin | expert explained is high cholesterol noticeable how cholesterol symptoms appear on the skin

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Yoga Asanas For Energy And Strength | दिवसाची सुरुवात ‘या’ योगासनांच्या सरावाने करा, राहील ताकद आणि चैतन्य

 

Pune Crime | हडपसर परिसरातील पादचार्‍यांना लुटण्याचा प्रयत्न करणार्‍या सराईत गुंडाची टोळी जेरबंद

 

Health Tips | आजारांना दूर ठेवण्यासाठी ‘हे’ आहेत उपयुक्त 5 पदार्थ; रात्री भिजत घालून खाल्ल्याने होईल फायदा, जाणून घ्या