नवी दिल्ली : High Cholesterol Symptoms | वाढत्या कॉलेस्ट्रॉलमुळे रक्तवाहिन्यांमध्ये प्लाक जमू लागते, ज्यामुळे ब्लॉकेज निर्माण होतात. यामुळे हाय ब्लड प्रेशर, हार्ट अटॅक आणि स्ट्रोकची समस्या होते. जर जास्त तेलकट आणि अनहेल्दी फूड आयट्म खाल्ले तर शरीरात बॅड कॉलेस्ट्रॉल तयार होऊ लागते. ही समस्या वेळीच ओळखली पाहिजे. कॉलेस्ट्रॉल वाढलेले असताना आपले शरीर कोणते संकेत देते जाणून घेऊयात…(High Cholesterol Symptoms)
कोलेस्ट्रॉल वाढल्याची लक्षणे
- छातीत वेदना (Chest pain)
छातीत वेदना होणे हे कोलेस्ट्रॉल वाढल्याचे लक्षण आहे. अशावेळी डॉक्टरांकडे जा.
- खुप घाम येणे ( Sweating)
जर नॉर्मल कंडीशन अथवा हिवाळ्यात सुद्धा खुप घाम येऊ लागला तर समजून जा की, हे हाय कोलेस्ट्रॉल आणि हृदयाच्या आजारांचे लक्षण आहे.
- वजन वाढणे (Weight Gain)
जर तुमचे वजन वेगाने वाढत असेल तर हे बॅड कोलेस्ट्रॉल वाढल्यामुळे होऊ शकते.
याकडे दुर्लक्ष न करता फिजिकल एक्टिव्हिटीज वाढवा आणि हेल्दी डाइट घ्या.
- स्किनचा कलर बदलणे (Change In Skin Color)
कोलेस्ट्रॉल वाढल्याने स्किनचा रंग बदलतो, त्वचेवर पिवळे चट्टे दिसू शकतात.
यासाठी अशी लक्षणे दिसल्यास वेळीच लिपिड प्रोफाईल टेस्ट करा.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा