High Court | 15 वर्षीय मुस्लिम मुलगी, मुलाच्या विवाहाबाबत उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

चंदीगड : पोलीसनामा ऑनलाइन – एका १७ वर्षीय मुस्लिम मुलीने ३३ वर्षीय हिंदू मुलाशी मंदिरात जाऊन लग्न केले. या लग्नाला मुलीच्या पालकांची संमती नव्हती. या जोडप्याने आई वडिलांपासून संरक्षण मिळावे म्हणून उच्च न्यायालयात (High Court) सुरक्षा याचिका दाखल केली होती. त्या याचिकेवरील सुनावणी वेळी पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयाचे (High Court) न्यायाधीश हरनेश सिंग गिल यांनी महत्त्वपूर्ण मत व्यक्त केले आहे. कायद्यात मुस्लीम मुलीच्या लग्नाला मुस्लीम वैयक्तिक कायदा लागू होतो, असा स्पष्ट उल्लेख आहे. वय वर्ष १५ म्हणजे प्रौढत्त्व आले असे समजले जाते. मुस्लीम मुलगा किंवा मुलगी प्रौढ झाल्यावर लग्न करण्यास स्वतंत्र आहे. अशा जोडप्यांना अडविण्याचा पालकांना कोणताही हक्क नसल्याचे स्पष्ट मत न्यायालयाने व्यक्त केले.

 

न्यायालयाने सांगितले की, विवाहाच्या क्षमतेला सर दिनशाह फरदुनजी मुल्ला यांचे पुस्तक प्रिन्सिपल्स ऑफ मोहम्मद लॉच्या अनुच्छेद १९५ परिभाषित करतो. विवाह बंधनात दृढ मनाचा कोणताही प्रौढ मुसलमान विवाह बंधनात प्रवेश करू शकतो. १५ वर्षानंतर तो प्रौढ समजला जातो. न्यायालय (High Court) त्यांना मूलभूत अधिकारांपासून वंचित करू शकत नसल्याचे स्पष्ट केले. कुटुंबियांच्या इच्छेविरुद्ध जोडप्याने लग्न केले म्हणून त्यांना वाटणाऱ्या असुरक्षिततेच्या भीतीकडे न्यायालय डोळेझाक करू शकत नाही. भारतीय घटनेत असलेल्या मूलभूत अधिकारांपासून आम्ही त्यांना वंचित ठेऊ शकत नाही असे सांगत या जोडप्याचे जीवित आणि स्वातंत्र्याच्या संरक्षणासाठी आवश्यक ती व्यवस्था करण्याचे निर्देश न्यायमूर्ती हरनरेश सिंग गिल यांनी पोलिसांना दिले.

लोकसभेमध्ये केंद्र सरकारने नुकतेच बाल विवाह प्रतिबंध विधेयक, २०२१ मांडले आहे. या विधेयकात सर्व धर्मातील मुलींच्या लग्नाचे वय मुलांच्या वया इतके म्हणजे २१ करण्याची शिफारस केली आहे. विरोधकांनी या विधेयकावर अधिक चर्चा करण्यासाठी हे विधेयक लोकसभेच्या स्थायी समितीकडे पाठविण्यास लावले आहे. विशेष विवाह अधिनियम १९५४ आणि बाल विवाह प्रतिबंध अधिनियम, २००६ अंतर्गत भारतात लग्नाचे कायदेशीर वय मुलींसाठी १८ आणि मुलांसाठी २१ वर्षे आहे, असे असले तरी मुस्लीम कायद्यानुसार लग्न किंवा निकाह एक करार असून त्यासाठी कोणतीही व्यक्ती प्रौढ झाली किंवा १५ वर्षांपेक्षा जास्त वयाची असल्यास तीला स्वतःच्या पसंतीप्रमाणे लग्न करण्यास स्वातंत्र्य आहे.

 

 

Web Title :- High Court | 15 year old muslim girl or boy can get married punjab haryana high court

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Gold Silver Price Today | खूशखबर ! सोन्या-चांदीच्या किंमतीत घसरण; जाणून घ्या आजचे दर

 

MLA Madhuri Misal | आमदार माधुरी मिसाळ यांना कोरोनाची बाधा

 

Coronavirus in Maharashtra | ‘कोरोना रुग्णसंख्या वाढतेय, लोक नियम पाळत नाहीत, महाराष्ट्र लॉकडाऊनच्या दिशेने’; ठाकरे सरकारमधील या मंत्र्याकडून सूचक संकेत