नाशिकला हादरवून टाकणाऱ्या ‘त्या’ खटल्यातील आरोपींची फाशी रद्द ; हायकोर्टाचे निर्देश

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – एका विवाहितेवर अत्याचाराचा प्रयत्न करून तिची आणि तिच्या ६ वर्षांच्या मुलाची ५२ वेळा चाकूने वार करून निर्घृण हत्या प्रकरणातील आरोपींना सुनावलेली फाशीची शिक्षा रदद् करून त्याला निर्दोष मुक्त करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे.

२०१६ साली सातपूर येथे एका विवाहितेवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न करत तिच्या सहा वर्षाच्या मुलावर आणि तिच्यावर ५२ वेळा चाकूने वार करून खून करण्यात आला होता. या प्रकरणानं संपूर्ण नाशिक शहर हादरून गेले होते. दरम्यान याप्रकऱणात नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने घरमालकाच्या मुलाला दोषी ठरवत त्याला फाशीची शिक्षा सुनावली होती. मात्र नाशिक सत्र न्यायालयाने सुनावताना ग्राह्य धरलेले मुद्दे हायकोर्टात आरोपीच्या वकीलाने खोडून काढले. घटनेनंतर रामदास याने आपला मित्र सुभाष राजपूत याच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून गुन्ह्याची कबूली दिली होती.

त्याच्या मोबाईलमध्ये आरोपीचा रेकॉर्ड झालेला कबूली जबाब न्यायालयात सादर करण्यात आला होता. मातर् सुनावणीदरम्यान सुभाष राजपूत याला फितूर घोषित करण्यात आले होते. त्यानंतर शेजाऱ्यांनीही चाकूने सपासप वार झाले तेव्हा कोणताही आवाज ऐकला नसल्याचे सांगितले होते. घटनेचा कोणताही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नाही. परिस्थितीजन्य पुराव्यांवर आधारित ही केस आहे. असा युक्तीवाद त्याचे वकिलांनी केला. तो यशस्वी ठरला आणि न्यायाधीश भूषण धर्माधिकारी आणि प्रकाश नाईक यांच्या खंडपीठाने त्याला सोडण्याचा निकाल दिला.

अशी होती घटना
कचरू संसारे आणि त्यांची पत्नी ३० वर्षीय पत्नी पल्लवी आणि ६ वर्षीय मुलगा विशाल आणि ३ मुली यांच्यासोबत रंगनाथ यांच्या घरात भाडेकरू म्हणून राहात होते. १७ मार्च २०१६ रोजी त्यांच्या तिन्ही मुली बाहेरगावी तर संसारे हे रात्रपाळीसाठी कामावर गेले होते. दरम्यान घरमालकाचा मुलगा रामदास शिंदे याने हीच संधी साधून पल्लवीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यानी विरोध करताच त्याने चाकूने वार करून पल्लवीला ठार केले. त्यावेळी मुलगा विशाल जागा झाला त्यालाही त्याने ठार मारले. सातपूर पोलिसांनी गुन्हा दाखळ करत त्याच्यावर दोषारोपपत्र दाखल केले. नाशिक सत्र न्यायालयाने हे हत्याकांड दुर्मिळातील दूर्मिळ ठरव रामदास शिंदेला फाशीची शिक्षा सुनावली होती.