High Court | गाय राष्ट्रीय प्राणी जाहीर करा, कुणालाही नाही तिला मारण्याचा अधिकार : हायकोर्ट

प्रयागराज : High Court | अलाहाबाद हायकोर्टाने वैदिक, पौराणिक, सांस्कृतिक महत्व आणि सामाजिक उपयुक्तता पाहता गाय राष्ट्रीय प्राणी घोषित करण्याचा सल्ला दिला आहे. कोर्टाने म्हटले की, भारतात गाईला माता मानतात. हा हिंदूंच्या श्रद्धेचा विषय आहे. श्रद्धेला धक्का लागल्यास देश कमजोर होतो. कोर्टाने म्हटले, गो मांस खाणे कुणाचा मूलभूत अधिकार (High Court) नाही. (Allahabad High Court said, Declare cow a national animal, no one has the right to kill her)

जीभेच्या चवीसाठी जगण्याचा अधिकार हिसकावला जाऊ शकत नाही. वृद्ध आजारी गायसुद्धा कृषीसाठी उपयुक्त आहे. तिच्या हत्येची परवानगी देणे योग्य नाही. ती भारतीय शेतीचा कणा आहे.

Job | सुनील माने यांच्या वतीने नोकरी महोत्सवाचे आयोजन

कोर्टाने म्हटले की, संपूर्ण जगात भारतच एक असा देश आहे जिथे सर्व संप्रदायाचे लोक राहतात. पूजा पद्धत जरी वेगळी असेल तरी विचार सर्वांचा एकच आहे. एकमेकांच्या धर्मांचा आदर केला जातो. गाईला मारणार्‍याला सोडले तर तो पुन्हा गुन्हा करेल. कोर्टाने संभलच्या जावेदचा जामीन अर्ज फेटाळला. हा आदेश न्यायमूर्ती शेखर कुमार यादव यांनी दिला.

जामीन अर्जावर शासकीय अधिवक्ते एस.के. पाल आणि ए.जी.ए. मिथिलेश कुमार यांनी प्रतिवाद केला. याचिकाकर्त्यावर साथीदारांसोबत खिलेंद्र सिंह यांची गाय चोरून जंगलात इतर गायींसह मारून मांस एकत्र करताना टॉर्चच्या प्रकाशात आढळून आल्याचा आरोप आहे. तो 8 मार्च 21 पासून जेलमध्ये बंद आहे. तक्रारकर्त्याने गायीचे कापलेले शिर ओळखले. आरोपी मोटरसायकल सोडून पळाले होते.

कोर्टाने म्हटले, 29 मेपासून 24 राज्यांमध्ये गोवध प्रतिबंध आहे. एक गाय जीवनकाळात 410 ते
440 लोकांचे जेवण जमवते. आणि गोमांसातून केवळ 80 लोकांचे पोट भरते. महाराजा रणजीत
सिंह यांनी गो हत्येवर मृत्यूदंड देण्याचा आदेश दिला होता.

अनेक मुस्लिम आणि हिंदू राजांनी गोवधावर बंदी घातली होती. तिचे मलमूत्र असाध्य रोगांवर
लाभदायक आहे. गायीचा महिमा वेद-पुराणांमध्ये सांगितला आहे. गायीच्या चरबीच्या मुद्द्यावरून
मंगल पांडेने क्रांती केली. संविधानात सुद्धा गो संरक्षणावर भर दिला आहे.

हे देखील वाचा

Anil Deshmukh | अनिल देशमुखांचे जावई CBIच्या ताब्यात, कुटुंबियांकडून अपहरणाचा आरोप?

7th Pay Commission | 7वा वेतन आयोग ! महागाई भत्त्याबाबत मोठी बातमी, जुलैच्या आकड्यांमध्ये इतका वाढला इंडेक्स

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  High Court | allahabad high court said central government should declare cow as national animal

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update