High Court | दोन धर्माच्या प्रौढ जोडप्याच्या वैवाहिक जीवनात कुणालाही हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही – हायकोर्ट

प्रयागराज : वृत्तसंस्था – High Court | अलाहाबाद हायकोर्टाने (High Court) एका महत्वाच्या आदेशात म्हटले आहे की, धर्म परिवर्तन कायदा 2021, विरूद्ध धर्म मानणार्‍या जोडप्याला विवाह करण्यापासून कुणीही रोखू शकत नाही. रजिस्ट्रारला हा अधिकार नाही की तो जिल्हाधिकार्‍याकडून धर्म परिवर्तनाची परवानगी न घेतल्याच्या आधारावर विवाह नोंदणी रोखून ठेवू शकतो (High Court has said in order that, No one has the right to interfere in the marital life of an adult couple of two religions).

कोर्टाने म्हटले, जिल्हाधिकार्‍याचे धर्म परिवर्तनासाठी अनुमोदन बंधनकारक नसून, निर्देशात्मक आहे. कोर्टाने म्हटले की, विरूद्ध धर्माच्या प्रौढ जोडप्याचे वैवाहिक जीवन, स्वातंत्र्य आणि गोपनीयतेमध्ये सरकार किंवा कोणत्याही खाजगी व्यक्तीला हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही.

कोर्टाने पोलिसांना विरूद्ध धर्माच्या विवाहित जोडप्यांना आवश्यकतेनुसार सुरक्षा आणि संरक्षण देण्याचे निर्देश दिले आहेत आणि विवाह नोंदणी अधिकार्‍याने जिल्हाधिकार्‍याच्या अनुमोदनाची प्रतीक्षा न करता तात्काळ नोंदणी करण्याचे निर्देश दिले आहेत.

जर कुणी फसवणूक किंवा दिशभूल केली असेल तर पक्षकारांना दिवाणी आणि फौजदारी कार्यवाही करण्याचा अधिकार आहे. सोबतच केंद्र सरकारला समान नागरी संहिता लागू करण्याच्या सुप्रीम कोर्टाच्या निर्देशावर विचार करण्यास सांगितले. हा आदेश न्यायमूर्ती सुनीत कुमार (Justice Suneet Kumar) यांनी मायरा उर्फ वैष्णवी विलास शिर्शिकर (Myra alias Vaishnavi Vilas Shirshikar), झीनत अमान उर्फ नेहा सोटी (Zeenat Aman alias Neha Soti) सह अंतधर्मीय विवाह करणार्‍या 17 युगलांच्या याचिका स्वीकारत दिला आहे.

कोर्टाने राज्य सरकारला आदेशाचे पालन करण्यासाठी सर्क्युलर जारी करण्याचे निर्देश दिले आहेत. सोबतच महानिबंधकांना आदेशाची प्रत केंद्र सरकारच्या विधी मंत्रालयाला आणि राज्याच्या मुख्य सचिवांना पालनासाठी पाठवण्याचे सुद्धा निर्देश दिले. (Allahabad High Court)

एकुण 17 युगलांनी याचिकांमध्ये विवाहाची नोंदणी रोखून ठेवण्याच्या किंवा नकार देण्यास आव्हान दिले होते. (High Court)

 

Web Title : High Court | allahabad high court said no one has the right to interfere in the married life of an adult couple of two religions

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Farm Laws | शेतकरी आंदोलनाचा मोठा विजय ! वर्षभरापासून सुरू होतं आंदोलन; 600 शेतकर्‍यांचा बळी का घेतला?, विरोधकांचा पीएम मोदींवर हल्ला

Farm Laws | PM नरेंद्र मोदींचा मोठा निर्णय ! 3 कृषी कायदे केंद्राकडून रद्द; देशवासियांची माफी मागून 7 वर्षाच्या काळात प्रथमच घेतले पाऊल मागे (व्हिडीओ)

Pune Crime | काय सांगता ! होय, चक्क पुणे महापालिकेला 1 कोटी रुपयांचा गंडा घालण्याचा प्रयत्न; गुन्हा दाखल, जाणून घ्या प्रकरण

Balasaheb Thorat | ‘पोटनिवडणूक बिनविरोध करावी याबाबत फडणवीसांसोबत चर्चा’ – थोरात

Maharashtra Gram Panchayat by-election | महाराष्ट्रातील 7 हजार ग्रामपंचायत सदस्यांच्या पोटनिवडणुकांसाठी तारखा जारी

Kanyaka Bank Chandrapur Recruitment 2021 | श्री कन्यका नागरी सहकारी बँकेत विविध पदांसाठी भरती, जाणून घ्या

NCP MLA Babajani Durrani | राष्ट्रवादीचे आमदार बाबाजानी दुर्राणी यांना गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी; प्रचंड खळबळ