इंजिनियर मारहाण प्रकरणी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घ्या’, उच्च न्यायालयाचे आदेश

पोलीसनामा ऑनलाइन – गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात सोशल मीडियावर पोस्ट केल्यामुळे एका अभियंत्याला बेदम मारहाण करण्यात आली होती. त्यानंतर मुंबई उच्च न्यायलयाने घटनेचे सीसीटीव्ही फूटेज ताब्यात घेण्याचे आदेश पोलिसांनी दिले आहे. हे सीसीटीव्ही फूटेज ताब्यात घेऊन दंडाधिकार्‍यांकडे सादर करावेत असे आदेश न्यायालयाने पोलिसांना दिले आहेत. त्यामुळे आव्हाडांच्या अडचणीत आणखी भर पडणार आहे.

मारहाणीमुळे अभियंता अनंत करमुसे यांनी उच्च न्यायलयामध्ये याचिका दाखल केली आहे. या प्रकरणामध्ये जितेंद्र आव्हाड यांना आरोपी करावे तसेच या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे (केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडे) द्यावा अशी मागणी या करमुसे यांने कोर्टात दाखल केलेल्या याचिकेत केली आहे. न्या. गिरीश कुलकर्णी यांनी या प्रकरणात सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेण्याचे आदेश दिले आहेत.

आव्हाड यांनी एक व्हिडीओ शेअर करत मोदींच्या या आवाहनाला विरोध दर्शवला होता. त्यांच्या या व्हिडीओनंतर अनंत करमुसेने त्यांच्याविरोधात फेसबुकवर पोस्ट केली होती. त्यानंतर त्याच रात्री दोन गणवेशधारी आणि दोन विना गणवेशातील पोलीस करमुसेच्या घरी आले आणि पोलीस स्टेशनला जायचे असे सांगून त्यांना घेऊन गेले. मात्र पोलीस स्टेशनला जाण्याऐवजी कुरमुसेला त्यांनी आव्हाड यांच्या बंगल्यावर नेले. तेथे काही लोकांनी कुरमुसेला बेदम मारहाण केली. त्यावेळी आव्हाड हेदेखील उपस्थित होते असा दावा कुरमुसेने केला आहे. त्यानंतर कुरमुसेला त्याने केलेली ती पोस्ट डिलिट करायला लावली. त्यानंतर माफीचा व्हिडीओ तयार करण्यात आल्याची माहिती कुरमुसेने दिली. या प्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. आव्हाड यांनी हे आरोप फेटाळून लावले आहे.