High Court | हॉटेलच्या खोलीत लग्न, जोडप्याने भांड्यात आग पेटवून केली ’सप्तपदी’; हायकोर्टने म्हटले – ‘विवाह मान्य नाही, 25000 दंड’

नवी दिल्ली : High Court | पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने (High Court) कठोर अ‍ॅक्शन घेतली आहे. जोडप्याच्या संरक्षण याचिकेवर सुनावणी करताना त्यांच्यावर 25 हजार रुपयांचा दंड लावला आहे. जोडप्याने दावा केला की, हॉटेलच्या खोलीत भांड्यात आग पेटवून त्यांनी ’सात फेरे’ घेऊन विवाहाची प्रतिज्ञा घेतली होती.

याचिकेत दावा केला होता की, त्यांचा विवाह झाला आहे. कारण त्यांनी एकमेकांना पुष्पहार घातले आहेत आणि हॉटेलच्या एका खोलीत एका भांड्यात आग पेटवून ’सप्तपदी’ (सातफेरे) केली होती. मात्र कुणी मंत्र म्हटले नाही. पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने (High Court) म्हटले की हे योग्य नाही. कोणतेही विवाह प्रमाणपत्र जोडलेले नाही, तसेच याचिकेत विवाहाचे छायाचित्र जोडलेले नाही.

हा ‘वैध विवाह सोहळा नव्हता. महिलेचे वय 20 वर्ष आहे, तर मुलाचे वय 19 वर्ष 5 महिने आहे.
दोघांनी आपल्या नातेवाईकांच्या भितीने आपल्या जीवाची सुरक्षा आणि स्वातंत्र्याच्या मागणीसाठी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला होता.
जोडप्याने 26 सप्टेंबरला हॉटेलच्या खोलीत विवाह केला होता.
त्यांच्याकडे दाखवण्यासाठी कोणतेही विवाह प्रमाणपत्र नाही.

मात्र, न्यायालयाला आढळले की, मुलाचे वय विवाहासाठी पात्र नव्हते.
दाम्पत्य न्यायालयाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत होते की, त्यांनी विवाह केला आहे.
न्यायालयाने पंचकुला पोलीस आयुक्तांना दाम्पत्याला सुरक्षा प्रदान करण्याचा आदेश दिला, कारण त्यांच्या जीवाला आणि स्वातंत्र्याला धोका आहे.

हे देखील वाचा

MNS-BJP Alliance | मनसेच्या ‘या’ बड्या नेत्याने घेतली फडणवीसांची बंगल्यावर जाऊन भेट; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

WhatsApp | व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये होणार मोठा बदल, लवकरच येणार ‘हे’ नवं फिचर

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  High Court | couple elopes to marry in hotel room hc says saat pheras fire lit in utensil is not valid fine

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update