कथित महिला छळ प्रकरण : संजय राऊत यांच्यावरील आरोपासंदर्भात 1 जुलै पर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश

मुंबई : एका महिला मानसोपचार तज्ज्ञाने शिवसेनेचे खासदार संजय राऊत (sanjay raut)
यांच्यावर केलेल्या छळवणूकीच्या आरोपासंदर्भात अहवाल सादर करण्यासाठी मुंबई पोलीस आयुक्तांनी काही दिवसांची मुदत उच्च न्यायालयाकडे मागितली. त्यानुसार न्यायालयाने हा अहवाल सादर करण्यासाठी १ जुलैपर्यंतची मुदत दिली आहे.

एका महिला मानसोपचार तज्ज्ञाने संजय राऊत आणि माझा पती छळ करत असल्याची याचिका उच्च न्यायालयात दाखल केली आहे. या याचिकेत हेरगिरी करणे, आपल्या मागे माणसे लावून पाळत ठेवणे, जीवे मारण्याचा प्रयत्न करणे, धाक दाखवणे यांसारखे आरोप राऊत आणि पतीवर केले आहेत.

या याचिकेवर न्या. एस. एस. शिंदे व न्या. एन. जे. जमादार यांच्या खंडपीठापुढे २२ जूनला सुनावणी झाली. त्यावेळी न्यायालयाने मुंबई पोलीस आयुक्तांना याप्रकरणाचा अहवाल २४ जूनपर्यंत सादर करण्याचे ओदश दिले होते. त्यानुसार गुरुवारी (दि२४) पुन्हा यावर सुनावणी झाली.

मात्र, यावेळी मुख्य सरकारी वकील दीप ठाकरे यांनी युक्तवाद करताना सांगितले की, सदर प्रकरणी पोलीस आयुक्तांनी कागदपत्रे मागवली असून चौकशीअंती सर्वसमावेशक अहवाल सादर करायचा आहे. त्यामुळे हा अहवाल तयार करण्यासाठी काही दिवसांचा अवधी देण्याची पोलीस आयुक्तांनी विनंती केली असल्याचे सांगितले. त्यानुसार न्यायालयाने ही विनंती मान्य करत १ जुलैपर्यंत अहवाल सादर करण्याची मुदत दिली आहे. त्याचबरोबर यापुढे आणखी मुदतवाढ देणार नसल्याचेही स्पष्ट केले.

उच्च न्यायालयात संबंधित महिलेने याचिका दाखल केल्यानंतर सायकॉलॉजीची बनावट डिग्री
घेतल्याप्रकरणी या महिलेला पोलिसांनी अटक केली होती. या अटकेलाही उच्च न्यायालयात या
महिलेने आव्हान दिले आहे. मार्चमध्येही सुनावणी झाली होती. त्यावेळी संजय राऊत यांचे वकील
प्रसाद ढाकेफाळकर यांनी याचिकाकर्तीने केलेले आरोप फेटाळले होते. त्याशिवाय याचिकाकर्ती ही
राऊत यांची फॅमिली फ्रेंड असून ती त्यांना मुली सारखी असल्याचे राऊत यांच्या वकीलांनी
न्यायालयास सांगितले होते.

हे देखील वाचा

Pune Crime News | कोल्हापूर येथून आलेल्या एकाला लुटणार्‍या 5 जणांना अटक

PM Modi | पीएम मोदींचा कॉंग्रेसवर हल्लाबोल, म्हणाले- आणीबाणीचा काळा दिवस विसरणे शक्य नाही

Narayan Gawli Died | कानगांवचे जेष्ठ नेते नारायण नाथु गवळी वय यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : high court directs submit report alleged harassment women july 1 allegations against shivsena mp sanjay raut

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update