एल्गार परिषद प्रकरण : पुणे पोलिसांना उच्च न्यायालयाचा ‘दणका’, गौतम नवलाखा यांच्याकडे असलेल्या कागदपत्रांत ‘आक्षेपार्ह’ काहीही नाही

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – एल्गार परिषद आणि माओवादी कनेक्शनप्रकरणी अटक करण्यात आलेले विचारवंत यांच्याविरोधातील आरोपांसदर्भात पुणे पोलिसांनी दाखल केलेल्या कागदपत्रांमध्ये काहीही आक्षेपार्ह वाटत नाही. असं महत्त्वाचे निरीक्षक मुंबई उच्च न्यायालयाने व्यक्त केले आहे.

काय आहे पोलिसांचा आरोप?

गौतम नवलाखा यांचा माओवाद्यांशी संबंध असल्यावरून तसेच एल्गार परिषदेत चिथावणी दिल्याने कोरेगाव भीमाचा हिंसाचार झाला असल्याच्या आरोपाखाली गौतम नवलखा यांच्याविरोधात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. त्यानंतर पुणे पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. नवलखा यांच्या लॅपटॉपमधून पोलिसांनी आक्षेपार्ह मजकूर आणि पत्रं जप्त केली आहेत. त्यातून त्यांचा माओवाद्यांशी संबंध असल्याचं स्पष्ट होतं. तसेच त्यांनी देशाविरोधात युध्द पुकारले असल्याचा आरोप पुणे पोलिसांनी केला आहे.

काय म्हणाले न्यायालय ?

गौतम नवलखा यांच्याविरोधात देशाविरोधात युद्ध पुकारणे आणि माओवाद्यांशी संबंध असल्याचा आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात फिर्याद रद्द करण्यासाठी त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर न्यायमुत्री रणजीत मोरे आणि न्यायमुर्ती भारती डोंगरे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.

नवलखा यांच्यावर असलेल्या आरोपांसदर्भातील कागदपत्रे न्यायालयात सीलबंद लिफाफ्यात कागदपत्रे सादर करण्यात आली. या कागदपत्रांवरून आणि पत्रांमधून सकृतदर्शनीतरी काहीही आक्षेपार्ह असल्याचं स्पष्ट होत नाही. त्यामुळे नवलखा यांना ही कागदपत्रे बाळगण्यास हरकत नाही. असे महत्त्वाचे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले.

नवलखा यांच्या वकिलांचा युक्तीवाद

नवलखा शांततेसाठी काम करतात. त्यांनी अनेक लेख आणि पुस्तके लिहीली आहेत. नक्षलींशी वाटाघाटी करण्यासाठीही केंद्र सरकारने त्यांना अनेकदा बोलवलं आहे. मात्र असे असतानाही पुणे पोलिसांनी त्यांच्यावर देशाविरोधात युद्ध पुकारण्यासारखे गंभीर गुन्हा दाखल केला आहे. असा युक्तीवाद याचिकाकर्त्यानी केला आहे.

१८ जूनपर्यंत याप्रकरणी सुनावणी तहकुब करण्यात आली आहे. तर नवलखा यांच्यावर तोपर्यंत कोणतीही कारवाई न करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

आरोग्य विषयक वृत्त – 

टीबीग्रस्त बाळाची घ्या काळजी ; ‘हे’ उपचार करणे आवश्यक

थायरॉइडच्या आजारात आराम मिळण्यासाठी करा ‘ही’ आसने 

सावधान ! अंधूक प्रकाशात वाचन करताय ? करावा लागेल या समस्यांचा सामना 

उपवासाने कमी होईल ‘लठ्ठपणा आणि डायबिटीसचा धोका’

You might also like