विनयभंग प्रकरण : निलंबित DIG निशिकांत मोरेंना हायकोर्टाचा दिलासा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी निलंबित डिआयजी निशिकांत मोरे यांना हायकोर्टाने दिलासा दिला आहे. विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी मोरे यांनी हायकोर्टात अर्ज दाखल केला होता. या अर्जावर सुनावणी झाली. हायकोर्टाने मोरे यांना अटकेपासून दिलासा देत अटक झाल्यास 25 हजारांच्या जामिनावर सुटका करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहेत. तसेच त्यांना 29,30 आणि 31 जानेवारी रोजी नवी मुंबईतील तळोजा पोलीस ठाण्यात हजेरी लावण्याचे आणि पोलिसांना तपासात सहकार्य करण्याचे निर्देश दिले आहेत.

पनवेल सत्र न्यायालयाने  निशिकांत मोरे यांचा जामीन अर्ज फेटळल्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालायत जामीनासाठी धाव घेतली. मोरे यांच्यावर तळोजा पोलीस ठाण्यात पॉस्कोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उच्च न्यायालयात धाव घेतल्यानंतर त्यांच्या याचिकेवरील सुनावणी पूर्ण झाली असून आज उच्च न्यायालयाने निर्णय देत मोरे यांना दिलासा दिला. मागील सुनावणीच्यावेळी मुलीच्या विनयभंग प्रकरणात मोरे यांना दिलास देण्यास उच्च न्यायालायाने नकार दिला होता. पनवेल सत्र न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावल्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यांच्या याचिकेवरील सुनावणी मंगळवारपर्य़ंत तहकूब करण्यात आली होती.

पनवेल न्यायालयाने अटपूर्व जामीन मंजूर करण्यास नकार दिला नाही. त्यामुळे आपण त्यांच्या अर्जावर मंगळवारी विचार करू असे न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांनी मोरे यांना तात्काळ दिलासा देण्यास नकार दिला. तसेच न्यायालयाने पुढील सुनावणीमध्ये मुलीने ज्या मोबाइल क्लिपद्वारे मोरे यांच्यावर विनयभंगाचा दावा केला आहे, त्या क्लिपचा पंचनामा आणण्याचे निर्देशही न्यायालयाने तळोजा पोलिसांना दिले.

फेसबुक पेज लाईक करा –