High Court | उच्च न्यायालयाने आयआयटी गोहाटीच्या विद्यार्थ्याला बलात्काराच्या प्रकरणात दिला जामीन, भविष्याची संपत्ती असल्याचं सांगितलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था High Court | गुहाटी उच्च न्यायालयाने सहकारी विद्यार्थीनीवर बलात्कारातील आरोपी आयआयटी-गोहाटीच्या एका विद्यार्थ्याला जामीन दिली आहे. आणि दोघांना ‘राज्याची भविष्याची संपत्ती‘ म्हटले आहे. आरोपी बीटेकचा विद्यार्थी असून त्याच्या जामीन याचिकेवर सुनावणी करताना न्यायमूर्ती अजीत बोरठाकुर यांनी म्हटले की, सर्व पुराव्यांच्या आधारावर याचिकाकर्त्याविरूद्ध प्रथमदर्शनी स्पष्ट (High Court) प्रकरण दिसत आहे.

आदेशात म्हटले आहे की, प्रकरणाचा तपास पूर्ण झाला आहे आणि माहिती देणारी पीडित मुलगी आणि आरोपी दोघेही आयआयटी, गोहाटीमध्ये तंत्रज्ञान शिक्षण घेत असलेले प्रतिभाशाली विद्यार्थी असल्याने राज्याची भविष्याची संपत्ती आहेत… जर आरोप ठरवले आहेत तर आरोपी कोठडीत ठेवणे योग्य ठरू शकत नाही.

न्यायालयाने आपल्या 13 ऑगस्टच्या आदेशात म्हटले आहे की, दोघे 19 ते 21 वर्ष वयोगटाचे आहेत आणि दोघे वेगवेगळ्या राज्यातून आहेत.
न्यायालयाने म्हटले, आरोपपत्रात नमूद साक्षीदारांच्या यादीचे अवलोकन केले असता,
आरोपीला जामीनावर सोडल्यास त्याच्याकडून साक्षीदारारांमध्ये छेडछाड करणे किंवा त्यांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष प्रकारे प्रभावित करण्याची कोणतीही शक्यता न्यायालयाला दिसत नाही.

उच्च न्यायालयाने आरोपीला 30 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर आणि दोन जामीनदारांच्या जामीनावर दिलासा दिला.
आरोप आहे की 28 मार्चच्या रात्री आरोपीने मुलीवर बलात्कार केला होता, जिला दुसर्‍या दिवशी मुक्त करून हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.
पोलिसांनी आरोपीला 3 एप्रिलला अटक केली होती.

 

Web Title : High Court | high court grants bail to iit guwahati student in rape case

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Crime | बिर्याणीवरून झालेल्या वादातून खुनाचा प्रयत्न, न्यायालयाने दोघांना सुनावली कोठडी

Pimpri Crime | महिलेचा पाठलाग करत केली शरीर सुखाची मागणी; तरुणावर FIR दाखल

Modi Government | विना सरकारी नोकरीसुद्धा मोदी सरकार सर्वांना देतंय पेन्शन, जाणून घ्या कशी मिळवावी