High Court | पत्नीच्या शरीराला आपली संपत्ती समजणे वैवाहिक बलात्कार, घटस्फोटासाठी हे ठोस कारण – उच्च न्यायालय

कोच्ची : वृत्तसंस्था –  केरळ हायकोर्टाने (Kerala High Court) म्हटले की, पत्नीच्या शरीराला पतीने आपली संपत्ती समजणे (wife’s body as property) आणि तिच्या इच्छेविरूद्ध लैंगिक संबंध ठेवणे (have sex against wife will) वैवाहिक बलात्कार (marital rape) आहे. कोर्टाने फमिली कोर्टाच्या घटस्फोटाला मंजूरी देण्याच्या निर्णयाला आव्हान देणार्‍या एका व्यक्तीचे दोन अपील फेटाळून (dismissed two appeals) लावत ही केरळ हायकोर्टाने (High Court) टिप्पणी केली.

विवाह कायदा पुन्हा बनवण्याची वेळ

न्यायमूर्ती ए. मोहम्मद मुस्ताक आणि न्यायमूर्ती कौसर एडप्पागथ यांच्या खंडपीठाने म्हटले की, विवाह आणि घटस्फोट धर्मनिरपेक्ष कायद्यांतर्गत झाले पाहिजेत आणि देशाचा विवाह कायदा पुन्हा बनवण्याची वेळ आली आहे.

वैवाहिक बलात्कार घटस्फोटाचे कारण

पीठाने म्हटले, दंडात्मक कायद्यांतर्गत वैवाहिक बलात्काराला कायदा मान्यता देत नाही.
केवळ हे कारण न्यायालयाला घटस्फोट देण्यास आधार म्हणून यास क्रौर्य मानण्यापासून रोखू शकत नाही.
यासाठी, आमचा विचार आहे की, वैवाहिक बलात्कार घटस्फोटाचा दावा करण्यासाठी ठोस आधार आहे.

पतीचे अपील फेटाळले

कोर्टाने क्रौर्याच्या आधारवर घटस्फोटाची याचिका स्वीकारणार्‍या कौटुंबिक न्यायालयाच्या निर्णयाविरूद्ध पतीचे अपील फेटाळले.
याशिवाय न्यायालयाने पतीद्वारे वैवाहिक अधिकारांची मागणी करणारी एक अन्य याचिका फेटाळली.

इच्छेविरूद्ध शारीरीक संबंध वैवाहिक बलात्कार

कोर्टाने आपल्या 30 जुलैच्या आदेशात म्हटले, पत्नीच्या शरीराला पतीने आपली संपत्ती समजणे आणि तिच्या इच्छेविरूद्ध शारीरीक संबंध ठेवणे वैवाहिक बलात्कार आहे.

 

पत्नी पैसे कमावण्याची मशीन

या दाम्पत्याचा विवाह 1995 मध्ये झाला होता आणि त्यांना दोन मुले आहेत.
कोर्टाने म्हटले की, व्यवसायाने डॉक्टर पतीने विवाहाच्या वेळी आपल्या पत्नीच्या वडिलांकडून सोन्याची 501 नाणी, एक कार आणि एक फ्लॅट घेतला होता.

कौटुंबिक न्यायालयाला आढळले की, पती आपल्या पत्नीसोबत पैसे कमावण्याच्या मशीनसारखे वर्तन करत होता आणि पत्नीने विवाहामुळे छळ सहन केला.
परंतु जेव्हा छळ आणि क्रौर्य सहन करण्याच्या पलिकडे गेले तेव्हा तिने घटस्फोटासाठी याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला.

 

Web Title : High Court | kerala high court upholds marital rape as valid ground to claim divorce

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Crime | शिक्षकेच्या पती अन् त्याच्या मैत्रिणीकडून फेसबुकवर अश्लील व घाणेरडया पोस्ट, महिलेनं उचललं मोठं पाऊल

Crime News | कलयुग ! पत्नीच्या चारित्र्यावर संशय असल्याने घेतली अग्निपरीक्षा, हातावर जाळला कापूर विश्वास न बसल्याने पाजले विष

Pune News | सक्सेस स्क्वेअर सोसायटीची मुख्यमंंत्री सहायता निधीस देणगी