High Court | अल्पवयीन मुलीसोबत तिच्या सहमतीने शरीरसंबंध ठेवणे हा देखील बलात्कारच – हायकोर्ट

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – High Court | अल्पवयीन मुलींना प्रेमाच्या जाळयात तसेच विविध प्रलोभने दाखवून वासनेची शिकार बनवणाऱ्यांना धडा शिकवणारा निर्णय मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे. एका प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान अल्पवयीन मुलीसोबत तिच्या सहमतीने शरीरसंबंध ठेवणे हाही बलात्कारच होतो, असे स्पष्ट करत न्यायमूर्ती विनय जोशी यांनी आरोपीची शिक्षा (High Court) कायम ठेवली आहे. गजानन देवराव राठोड (रा. नेर जि. यवतमाळ ) असे आरोपीचे नाव आहे.

पीडितेच्या सहमतीचा मुद्दा मांडून बलात्काराचा गुन्हा सिद्ध होत नाही, असा दावा आरोपीने केला. मात्र न्यायालयाने हा मुद्दा फेटाळून लावला. कायद्याच्या दृष्टिकोनातून अल्पवयीन मुलीने शरीरसंबंधास सहमती दिली याला काहीच महत्त्व नाही, असेही निकालात नमुद करण्यात आले आहे. २०१८ मध्ये विशेष सत्र न्यायालयाने गजानन राठोडला मुलीवर बलात्कार करण्याच्या गुन्ह्यात दोषी ठरवून कमाल १० वर्षे सश्रम कारावास व ११ हजारांच्या दंडाची शिक्षा सुनावली होती.

प्रेमाच्या जाळ्यात ओढले

पीडिता १४ वर्षाची असताना तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढून २७ जून २०१६ मध्ये आरोपीने तिला पळवून आत्याच्या घरी नेले. त्यावेळी मुलीशी लग्न केल्याचे सांगितले. त्यानंतर आत्याने राहण्यासाठी त्यांना खोली दिली. त्यामुळे दोन दिवस आरोपीने मुलीसोबत शरीरसंबंध ठेवले. नातेवाईकांनी दोघांनाही तिसऱ्या दिवशी नेरमध्ये परत आणले. दरम्यानच्या काळात मुलीच्या आईने पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली होती.

हे देखील वाचा

Pune Crime | आकाश भापकर टोळीवर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्तांची ‘मोक्का’ कारवाई; आतापर्यंत 54 गँगवर MCOCA अ‍ॅक्शन

Pune Dam Water Level | पुण्याच्या खडकवासला प्रकल्पातील चारही धरणे 100 % भरली; 11 धरणे ‘ओव्हर फ्लो’

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  High Court | nagpur bench says consensual sexual intercourse minor girl rape

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update