High Court | कुणीही घेऊ शकत नाही 2 प्रौढ व्यक्तींच्या संबंधाला आक्षेप, मग ते आई-वडील असले तरीही – हायकोर्ट

अलाहाबाद : High Court | आपल्या पसंतीचा जोडीदार निवडणार्‍याबाबत अलाहाबाद कोर्टाने (Allahabad High Court) पुन्हा एकदा म्हटले की, हा दोन प्रौढ लोकांचा अधिकार आहे (Right To Choose Life Partner). कोर्टाने म्हटले की, ते कुठल्याही धर्माचे असले तरी तो त्यांचा अधिकार आहे. यावर मुलगी किंवा मुलाचे आई-वडील आक्षेप घेऊ शकत नाहीत.

शिफा हसन आणि तिच्या जोडीदारा सुरक्षा प्रदान

जस्टिस मनोज कुमार गुप्ता आणि जस्टिस दीपक वर्मा यांच्या खंडपीठाने मुस्लिम तरूणी शिफा हसन आणि तिच्या हिंदू जोडीदाराने दाखल केलेल्या याचिकेवर हा आदेश पारित केला.

या याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे की, ते एकमेकांवर प्रेम करतात आणि आपल्या इच्छेने सोबत राहात आहेत. कोर्टाने शिफा हसन आणि तिच्या जोडीदाराला सुरक्षा प्रदान करत म्हटले की, त्यांच्या संबंधांवर त्यांचे आई-वडीलसुद्धा आक्षेप घेऊ शकत नाहीत.

धर्म कोणतेही असोत, जोडीदार निवडण्याचा अधिकार

पीठाने म्हटले, याबाबत कोणताही वाद नाही की, दोन प्रौढ व्यक्तींकडे आपल्या पसंतीचा जोडीदार निवडण्याचा अधिकार आहे, जरी त्यांचे धर्म कोणतेही असोत. कारण याचिका दोन अशा लोकांद्वारे दाखल करण्यात आली आहे जे एकमेकांवर प्रेम करण्याचा दावा करतात आणि प्रौढ आहेत, यासाठी कुणीही व्यक्ती त्यांच्या संबंधाबाबत आक्षेप घेऊ शकत नाही.

मुलीने हिंदू धर्म घेण्यासाठी केला अर्ज

पीठाने पोलीस अधिकार्‍यांना निर्देष दिले की याची दक्षता घ्या की याचिकाकर्त्यांना त्यांचे आई-वडील किंवा इतर कुणी व्यक्ती त्रास देणार नाहीत.
सुनावणी दरम्यान कोर्टाने म्हटले की, तरूणीने मुस्लिम धर्म सोडून हिंदू धर्म अलंबण्यासाठी एक अर्जसुद्धा केला आहे.
या अर्जावर जिल्हाधिकार्‍यांनी संबंधित पोलीस ठाण्याकडून रिपोर्ट मागवला आहे.

आमच्या जीवाला धोका

रिपोर्टनुसार, तरूणाचे वडील या विवाहासाठी तयार नाहीत, परंतु त्याची आई तयार आहे. तिकडे, शिफाचे आई-वडील या विवाहाविरूद्ध आहेत. यामुळे तरुण-तरूणीने हायकोर्टाकडे धाव घेतली, त्यांचे म्हणणे आहे की त्यांच्या जीवाला धोका आहे.

हे देखील वाचा

Pune Journalist Arrest | व्यावसायिकाकडे 5 लाखांची खंडणी मागणार्‍या पत्रकार अर्जुन शिरसाठ याला अटक; यापूर्वीही उकळली होती पाच लाखांची खंडणी, फोनवरील संभाषणातून उघड

MLA Ashutosh Kale | शिर्डी संस्थानच्या अध्यक्षपदी NCP चे आमदार आशुतोष काळे यांची नियुक्ती

Pune Crime | भावकीच्या वादातून पुतण्याकडून चुलत्यावर कुऱ्हाडीने हल्ला; शिरूर तालुक्यातील घटना

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  High Court | no one can put any objection on relationship of two adults not even their parents says allahabad high court

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update