High Court Order On Corona Mask Rules | ‘विमानात मास्क न लावणाऱ्यांवर कठोर कारवाई करा’ – उच्च न्यायालयाचे आदेश

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – High Court Order On Corona Mask Rules | वाढत्या कोरोना (Corona) रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर दिल्ली हायकोर्टाकडून (Delhi High Court) निर्देश देण्यात आले आहेत. विमानतळं (Airports) आणि विमानांमध्ये (Plane) मास्क न लावणाऱ्यांकडून दंड आकारण्यात यायला हवा. नियम कठोरपणे लागू व्हायला हवेत. असं न्यायालयानं म्हटलं आहे. विमानतळ आणि विमानांमध्ये मास्क सक्तीनं लागू करण्याचा आदेश हाय कोर्टाकडून जारी (High Court Order On Corona Mask Rules) करण्यात आला आहे.

 

मुख्य न्यायाधीश विपिन सांघी (Chief Justice Vipin Sanghi) यांच्या म्हणण्यानुुसार, विमानतळांवर आणि विमानांमध्ये विमान कर्मचाऱ्यांनी मास्क घालायला हवेत. हात स्वच्छ ठेवायला हवेत. कर्मचारी नियमांचं पालन करतात की नाही ते पाहण्याची जबाबदारी डीजीसीएची आहे. विमान प्रवासादरम्यान नियम मोडणाऱ्या व्यक्तींवर गुन्हा (FIR) नोंदवायला हवा. त्यांचा समावेश नॉन फ्लाय यादीमध्ये (Non-Fly list) करायला हवा, असं सांगण्यात आलं आहे. (High Court Order On Corona Mask Rules)

मुख्यमंत्री ठाकरेंनी घेतली कोविड टास्क फोर्सची बैठक –
महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी (CM Uddhav Thackeray) काल (गुरूवारी) कोविड टास्क फोर्सची (Covid Task Force) बैठक घेतली आहे.
लोकांनी मास्कचा वापर करायला हवा. लस घेतली नसल्यास ती घ्यायला हवी. नियमांचे पालन करायला हवं.
लोकांना लॉकडाऊन नको असेल, तर या गोष्टी कटाक्षानं पाळायला हव्यात, असं आवाहन त्यांनी केलं आहे.

 

देशात 4 हजार 41 नव्या कोरोना रुग्णांची नोंद –
मागील 24 तासांत देशात 4 हजार 41 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.
तीन महिन्यांत पहिल्यांदाच देशात एका दिवसात 4 हजाराहून जादा रुग्ण आढळून आले आहेत.
24 तासांत 10 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच, दोन हजार 263 जण कोरोनामुक्त झाले आहेत.
अशी माहिती आरोग्य मंत्रालयानं (Ministry of Health) दिली.

 

Web Title :- High Court Order On Corona Mask Rules | delhi high court calls for strict action against air passengers violating mask rules

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा