High Court – Passport | ‘गुन्हेगारी केसमध्ये अपील प्रलंबित असल्याच्या कारणाने पासपोर्ट रोखू शकत नाही’ – हायकोर्ट

प्रयागराज : अलाहाबाद हायकोर्ट (Allahabad High Court) ने आपल्या एका आदेशात म्हटले आहे की, कुणालाही पासपोर्ट (Passport) जारी करताना तो या आधारावर रोखता येणार नाही की, केसधून सुटका (High Court – Passport) झाल्यानंतर त्या व्यक्तीच्या विरोधात सरकारचे अपील प्रलंबित आहे. (High Court – Passport)

 

कोर्टाने म्हटले की, एकदा सुटका झाल्यानंतर त्याला तोपर्यंत निर्दोष मानले जाईल, जोपर्यंत अपीलमध्ये सुटका होण्याचा आदेश बदलला जाणार नाही. हा निर्णय जस्टिस अश्वनी कुमार मिश्र (Justice Ashwani Kumar Mishra) आणि जस्टिस विक्रम डी. चौहान (Justice Vikram D. Chouhan) यांच्या बेंचने प्रमोद कुमार राजभर यांची याचिका मंजूर करत दिला. (High Court – Passport)

 

केसमधून सुटका झाल्यानंतर याचिकाकर्ता प्रमोद कुमार राजभर (Pramod Kumar Rajbhar) यांनी पासपोर्टसाठी अर्ज केला होता. परंतु त्यांच्या या अर्जावर विचार करण्यात आला नाही. कारण सत्र न्यायालयातून गुन्हेगारी केसमधून सुटका झाल्यानंतर सरकारने अपील केले आहे. जे सध्या विचाराधीन आहे. याचिकाकर्त्याच्या विरोधात 2014 मध्ये एका मुलीवर बलात्कार केल्याचा खटला चालला. सत्र न्यायाधीशांनी त्याची या केसमधून डिसेंबर 2020 मध्ये सुटका केली होती.

 

यानंतर त्याने पासपोर्टसाठी अर्ज केला होता. परंतु त्याच्या अर्जावर विचार करण्यात आला नाही.
हायकोर्टाने म्हटले की, पासपोर्ट अ‍ॅक्ट अंतर्गत पासपोर्ट जारी न करण्यासाठी जे कारण सांगितले आहे,
त्यामध्ये याचिकाकर्त्याची केस येत नाही. कोर्टाने निर्देश जारी केला की, 3 महिन्यात पासपोर्ट जारी करण्याची प्रक्रिया पूर्ण करावी.

 

Web Title :- High Court – Passport | allahabad high court said cannot stop passport on the ground of criminal case pending in appeal

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा