१ कोटी ७० लाख लाच प्रकरण : वानखेडे यांना कोणत्याही क्षणी होऊ शकते अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – जमीनीच्या वादात निकाल बाजूने देण्यासाठी वकिलामार्फत १ कोटी ७० लाखांची लाच घेतल्याप्रकऱणी भूमी अभिलेख उपसंचालक बाळासाहेब वानखेडे यांचा अटकपुर्व जामीन मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावला. जामीन फेटाळल्यानंतर पुन्हा वानखेडे पसार झाले आहेत. त्यांचा जामीन उच्च न्यायालयाने फेटाळल्याने त्यांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते.

Advt.

वानखेडे यांच्याविरोधात कट रचणे, या कलमाखाली लाचलुचपत प्रतिबंधक पथकाकडून गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. त्यानंतर त्यांनी अटकपुर्व जामीनासाठी शिवाजीनगर न्यायालयात अर्ज केला होता. तो न्यायालयाने फेटाळून लावला होता. गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून वानखेडे पसार आहेत. त्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात अटकपुर्व जामीनासाठी धाव घेतली. मात्र तो मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावला. मागील पंधात ते वीस दिवसांपासून वानखेडे पसार आहेत. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून त्यांचा शोध सुरु आहे. परंतु त्यांचा ठावठिकाणा लागत नाही. परंतु त्यांना आता कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते.

वानखेडे यांचा अटकपुर्व जामीन उच्च न्यायालयाने फेटाळला आहे. त्यांचा शोध आम्ही घेत आहोत. पोलिसांकडून त्यांचा शोध सुरुच आहे. परंतु अद्याप त्यांचा ठावठिकाणा लागलेला नाही. तसेच त्यांनी सर्वोच्च न्यायालयात अद्याप दाद मागितली नाही. असे पोलीस अधिक्षक संदिप दिवाण यांनी सांगितले.