सहमतीनं ‘सेक्स’ केल्यानंतर अचानक ‘ब्रेकअप’ झालं तर तो गुन्हा ठरत नाही : हायकोर्ट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – शारीरिक संबंध आले असताना अचानकपणे प्रेम संबंध संपुष्टात आणणे यापुढे गुन्हा मानला जाणार नाही. हायकोर्टाने एका गुन्ह्यात निकाल देताना हे विधान केले आहे. झाशी मधील बलात्कार प्रकरणातील एका आरोपीला निर्दोष सोडताना न्यायालयाने हा निकाल दिला आहे. यावेळी निकाल देताना कोर्टाने म्हटले कि, न्यायालयाच्या निकालात कोणतीही त्रुटी नसून सहमतीने शारीरिक संबंध ठेवणे गुन्हा असणार नाही.

या प्रकरणातील महिलेने एका व्यक्तीवर बलात्काराचा आरोप केला होता. हि महिला एकदा आरोपीच्या आईला भेटण्यासाठी त्याच्या घरी गेली असता त्याने तिच्याबरोबर हे दुष्कर्म केले होते. त्यानंतर लग्नाचे वचन देत अनेकवेळा तिच्याबरोबर शारीरिक संबंध ठेवले होते. मात्र त्यानंतर 2016 साली तिने पोलिसांत यासंबंधी तक्रार दाखल करत त्याच्यावर बलात्काराचा आरोप केला होता. मात्र या प्रकरणात निकाल देताना न्यायालयाने म्हटले कि, ती सहमतीने त्याच्यासोबत हॉटेलमध्ये गेली होती. त्याचबरोबर मोठ्या कालावधीसाठी ती त्याच्याबरोबर होती. त्यामुळे तिने केलेल्या आरोपांमध्ये काहीही तथ्य नसल्याचे म्हणत न्यायालयाने त्याला निर्दोष सोडले.

दरम्यान, लग्नाचे वचन देत त्याने आपल्यावर बलात्कार केल्याचा आरोप देखील न्यायालयाने खोडून काढला आहे. तसेच महिलेचे आईवडील देखील तिचे लग्न आरोपीबरोबर लावून देण्यास तयार नाहीत.

visit : Policenama.com