High Court | सासऱ्याच्या संपत्तीवर जावयाचा अधिकार नाही – उच्च न्यायालय

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  High Court | सासऱ्याच्या संपत्तीत वाटा मागणाऱ्या जावयाचा दावा कनिष्ठ न्यायालयाने फेटाळून लावला. त्या निर्णयाविरोधात केरळ उच्च न्यायालयात (High Court) अपील केले. मात्र, ते अपीलही हायकोर्टाने फेटाळून लावले तसेच सासऱ्याच्या मालमत्तेत आणि इमारतीमध्ये जावयाचा कोणताही कायदेशीर अधिकार असू शकत नाही. जरी त्याने इमारतीच्या बांधकामासाठी काही रक्कम खर्च केली असेल तरी देखील त्याचा अधिकार राहणार नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे.

तालिपारंबा, कन्नूर येथील डेव्हिस राफेल यांनी सासरे सासरे हेंड्री थॉमस यांच्या मालमत्तेवर दावा करणारे अपील हायकोर्टात (Kerala High Court) दाखल केले होते त्याची सुनावणी न्यायमूर्ती एन अनिल कुमार यांच्यासमोर झाली.
न्यायमूर्ती एन. अनिल कुमार (Justice N. Anil Kumar) यांनी दंड लावत दुसऱ्या अपीलला तहकूब केले.
मुलीशी विवाहानंतर केल्यानंतर त्या हा त्या परिवाराचा हिस्सा मानला जातो.
मात्र सासऱ्याच्या संपत्तीवर जावयाचा अधिकार आहे असा त्याचा अर्थ होता नाही.
घरामध्ये राहत असला तसेच घराच्या बांधकामासाठी त्याने पैसे दिले असले तरी जावयाचा त्या घरावर किंवा सासऱ्याच्या संपत्तीवर हक्क नाही.

परदेशात जेवढा मान दिला जातो त्यापेक्षाही भारतात दिला जातो.
भारतात अशा अनेक घटना घडल्या आहेत की, श्रीमंत मुलींशी विवाह करून घर जावई झाल्यानंतर सासऱ्याच्या संपत्तीवर दावा सांगतात.
न्यायालयात (High Court) असे अनेक दावे प्रलंबित आहेत.
असे वाद परस्पर संमीतीने मिटवण्याचा प्रयत्न केला जातो. पण ते पूर्णपणे मिटत नाही.
घरजावयाने संपत्तीवर सांगितलेल्या दाव्यामुळे अनेक संसार उद्ध्वस्त झाले आहे. त्यामुळे जावई हा घरातील सदस्य असला तरी घर जावई असणे हे लज्जास्पद असल्याचे निरीक्षण कोर्टाने नोंदवले आहे.

 

Web Title : High Court | son in law has no legal right in father in law s property says kerala high court

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Maharashtra Rains | राज्यात आगामी 4 दिवस या भागात ‘धो-धो’ पावसाचा इशारा

SBI PO Recruitment 2021 | SBI मध्ये 2056 जागांसाठी बंपर भरती, जाणून घ्या प्रक्रिया

Modi Government | रस्ता दुर्घटनेत जखमी लोकांना हॉस्पिटलमध्ये पोहचवणार्‍यांना बक्षीस देणार मोदी सरकार, जाणून घ्या किती मिळेल रक्कम