High Court | केरळ हायकोर्टाचा महत्वाचा निकाल ! आक्षेपार्ह पोस्टला WhatsApp Admin नसणार जबाबदार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – High Court | व्हॉट्सॲपवर (WhatsApp) अनेक आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल (Offensive Post Viral) केल्या जातात. या पोस्ट संदर्भात व्हॉट्सॲप ग्रुपच्या ॲडमीनवर (Group Admin) कारवाई (Action) केली जाते. मात्र, केरळ हायकोर्टाने (Kerala High Court) याबाबत एक महत्वाचा निर्णय दिला आहे. या निकालामुळे व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सदस्यांनी आक्षेपार्ह पोस्ट केली तर त्याला ॲडमीन जबाबदार (Not Liable) असणार नाही. याबाबतच्या एका खटल्यावर सुनावणी करताना केरळ हायकोर्टाने (High Court) हा महत्वाचा निर्णय दिला आहे.

 

मार्च 2020 मध्ये फ्रेन्ड्स नावाच्या एका व्हॉटसॲप ग्रुपमध्ये एक व्हिडिओ शेअर करण्यात आला होता.
ज्यामध्ये चाईल्ड पॉर्न (Child Porn) संबंधित कंटेन्ट होता.
हा ग्रुप याचिकाकर्त्यानं बनवला होता आणि तोच या ग्रुपचा ॲडमिन होता.
याचिकाकर्त्यांपैकी आणखी दोघे जण या ग्रुपचे ॲडमिन होते. यापैकी एक जण आरोपी होता.
दरम्यान, या पोस्टनंतर सुरुवातीला आरोपीविरोधात माहिती तंत्रज्ञान अधिनियमांतर्गत (Information Technology Act) आणि पोक्सो कायद्यांतर्गत (POCSO Act) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला होता.
त्यानंतर ॲडमिन असल्याकारणानं याचिकाकर्त्याला देखील या प्रकरणात सहआरोपी करण्यात आले होते.
यानंतर याचिकाकर्त्याने केरळ हाय कोर्टात (High Court) धाव घेतली होती.

 

निर्णय देताना कोर्टाने काय म्हटले ?
हायकोर्टाने या खटल्यावर सुनावणीदरम्यान म्हटलं, व्हॉट्सॲप ग्रुपच्या ॲडमिनकडे एकमेव विशेषाधिकार हा असतो की तो कोणत्याही सदस्याला ग्रुपमधून रिमूव्ह (Remove) करु शकतो अथवा ॲड करु शकतो.
ग्रुपमधील कोणता सदस्य काय पोस्ट करतोय यावर त्याचं कोणतंही नियंत्रण नसतं.
तो ग्रुपमधील मॅसेजला मॉडरेट (Moderate Message) किंवा सेन्सर (Sensor) करु शकत नाही.

न्यायमूर्ती कौसर एडप्पागथ (Justice Kauser Adappagath) म्हणाले, गुन्हेगारी कायद्यात एखाद्या घटनेची जबाबदारी केवळ त्याचवेळेस निश्चित केली जाऊ शकते ज्यावेळी कायद्यात तशा प्रकारच्या गुन्ह्याचा उल्लेख असेल.
मात्र सध्या आयटी ॲक्टमध्ये असा कुठल्याही गुन्ह्याचा स्पष्ट उल्लेख नाही.
एका व्हॉट्सॲप ग्रुपचा ॲडमिन हा आयटी कायद्यानुसार मध्यस्थ असू शकत नाही.

 

Web Title :- High Court | whatsapp group admins not liable for objectionable posts by members says kerala high court whatsapp news

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा