‘हाय हील्स’ वापरल्यानं होतात ‘हे’ 4 मोठे तोटे ! जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   अनेक महिला किंवा मुली स्टायलिश, उंच आणि सुंदर व्यक्तीमत्व दिसावं म्हणून हाय हील्स घालतात. काहींना याचे तोटे माहित असल्यानं ते सतत याचा वापर करत नाहीत. परंतु अनेकांना याच्या नुकसानीबद्दल माहित नसतं आणि ते रेग्युलर याचा वापर करतात. परंतु असं करणं नुकसानदायक ठरू शकतं. आज आपण हाय हील्स घालण्याचे नुकसान जाणून घेणार आहोत. याने कोणते आजार किंवा समस्या येतात याची सविस्तर माहिती घेऊयात.

1) गुडघ्याची समस्या – हाय हील्स घालून चालण्यानं पाय सामान्यपण रोटेट होत नाही. यामुळं गुडघ्यांवर अधिक दबाव येतो. यामुळं तुम्हाला गुडघ्याची समस्या उद्भवते.

2) लोअर बॅक पेन – हाय हील्स घालून चालताना त्या त्या भागांवर वजनाची योग्य विभागणी होत नाही. यामुळं पाठीवर आणि कंमरेवर दबाव जास्त पडतो. यामुळं लोअर बॅक पेनची समस्या येते.

3) पाय आणि तळव्यांचं दुखणं – दिवसभर हाय हील्स घातल्यानं पाय आणि तळव्यांमध्ये वेदना होतात.

4) वॅरिकोज व्हेन्स आजार – हाय हील्सच्या वापरामुळं वॅरिकोज व्हेन्स हा पायांचा आजार होतो. यात पायांच्या नसांना सूज येते. साधारण 7 टक्के महिलांना आणि तरुणींना हा आजार असतो. जेव्हा खालच्या अंगांचे व्हॉल्व कमजोर होतात तेव्हा वॅरिकोज नसांमध्ये सूज येते. हाय हिल्स व्यतिरीक्त टाईट जिन्स घातल्यानंही ही समस्या येते.