Flashback 2019 : डॉक्टरपासून महिला ड्रग निरीक्षकापर्यंतचे ‘हे’ 8 हत्याकांड देशभरात ‘गाजले’, आठवल्यावर येतो अंगावर ‘काटा’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – 2019 हे वर्ष काही दिवसात संपणार आहे. या वर्षी अनेक गुन्हे, बलात्कार, खून अशा घटना समोर आल्या त्यामुळे हे वर्ष काही ठराविक घटनांसाठी कायमच चर्चेत राहीलं. मात्र यामध्ये अजून एका घटनेची भर पडली आहे. घडलेल्या घटनेत मृतांमध्ये दोन बहिणी आणि एकाच परिवारातील सात लोकांचा समावेश आहे. तसेच यावेळी एका गर्भवती महिलेची हत्या करून तिच्या पोटातून मुल बाहेर काढण्यात आले होते.

ड्रग इंस्पेक्टर नेहा शौरी

1) ड्रग इंस्पेक्टर नेहा शौरीची हत्या
मार्च 2019 मध्ये पंजाबमध्ये मोरिंडा येथे राहणाऱ्या बलविंदर सिंहने फूड अ‍ॅन्ड केमिकल टेस्टिंग लॅबमध्ये घुसून डॉ. नेहा शौरी यांची दिवसाढवळ्या गोळ्या घालून हत्या केली होती. त्यानंतर पळून जाताना लोकांनी घेरले असता त्याने स्वतःला गोळी मारून घेतली, राज्याचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी याबाबत तपासाचे आदेश दिले होते.

गर्भवती महिला की हत्या करने वाले

2) गर्भवती महिलेची हत्या करून पोट कापून काढले सात महिन्यांचे मुल –
मे 2019 मध्ये पंजाब बटाला, काला नंगल गावामध्ये मुलं नसल्यामुळे महिलेने आपल्या परिवारातील सदस्यांसोबत मिळून महिला तांत्रिकच्या सांगण्यानुसार शेजारी राहणाऱ्या सात महिण्याच्या गर्भवती महिलेचा खून केला होता. खुनानंतर महिलेचे पोट फाडून त्यातून सात महिन्यांचे मुल बाहेर काढत स्वतःच्या घरात दफन केले होते. दोन दिवसांपासून गर्भवती महिला गायब होती. पोलिसांनी मांत्रिक महिलेसह सात जणांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी यासाठी वापरलेले हत्यार आणि रक्ताने माखलेले कपडे देखील जप्त केले आहेत आणि आरोपींना देखील अटक केली आहे.

डॉ. राजीव गुप्ता की हत्या

3) प्रसिद्ध डॉक्टर राजीव गुप्ताची हत्या –
जुलै 2019 मध्ये हरियाणाच्या करनाल जिल्ह्यात अमृतधारा रुग्णालयाचे मालक व वरिष्ठ डॉक्टर राजीव गुप्ता यांची दुचाकी वरून आलेल्या तीन बदमाशांनी दिवसाढवळ्या गोळी मारून हत्या केली होती. यामध्ये दोन गोळ्या डॉक्टरांना लागल्या होत्या. त्यांना तातडीने त्यांच्याच रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. त्यांच्याच रुग्णालयातील एका कर्मचाऱ्याने त्यांची ही हत्या घडवून आणली होती.

दो बहनों की हत्या

4) रक्षणबंधांच्या दिवशी दोन बहिणींची हत्या –
चंदिगडमध्ये कडक सुरक्षा असूनही 15 ऑगस्ट रोजी दोन बहिणींची हत्या करण्यात आली. एकीच्या पोटात चाकूने वार केले गेले, तर दुसऱ्या बहिणीचा शिरच्छेद करुन ठार मारण्यात आले. सीसीटीव्हीमध्ये एक तरुण घरात शिरताना आणि बाहेर पडताना दिसला त्यानंतर यासंबंधी चंदीगड पोलिसातील सेवानिवृत्त उपनिरीक्षकाचा आरोपी मुलगा कुलदीप सिंग (वय 30) याला अटक केली.

नहर में कार डुबोकर सात लोगों की हत्या

5) कुटुंबासोबत मुलाची हत्या –
सप्टेंबर 2019 मध्ये पंजाबच्या अबोहर जिल्ह्यातील तूतवाला गावामध्ये कार बुडाल्याने सात लोकांचा मृत्यू झाला होता आणि ही दुर्घटना नसून खून होता. बलविंदर सिंह यांनी ही घटना घडवून आणली होती. त्यावेळी ते देखील कारमध्ये होते. आरोपी कुटुंबाकडून सतत बोल लावत असल्यामुळे वैतागला होता. म्हणून सर्व जण गाडीत असताना त्याने गाडी पाण्यात बुडवली होती. तपासादरम्यान पोलिसांनी आरोपीला खाक्या दाखवल्यामुळे त्याने हे सर्व कबूल केले होते.

पांच हत्याएं करके खुदकुशी करने वाला युवक

6) पाच जणांची हत्या करून सुसाईड –
ऑगस्ट 2019 मध्ये, पंजाबच्या मोगा येथील नाथूवाला गरबी गावात संदीप सिंगने आपले वडील मनजीत सिंग (55), आई बिंदर कौर (50), आजी गुरदीप कौर (70), बहीण अमनजोत कौर (33), भाची माणित यांच्यासह 32 बोअरच्या रिव्हॉल्व्हरने गोळी झाडली आणि हत्या केली. आजोबा गुरचरण सिंग यांनाही गोळ्या घालण्यात आल्या, परंतु ते वाचले. खून करून त्याने स्वतः देखील आत्महत्या केली. संदीपने सुसाइड नोट देखील लिहिली होती, ज्यात त्याने एका गुप्त आजाराने ग्रस्त असल्याचे लिहिले आहे. पोलिसांनी संदीपसिंग सनीविरोधात बाघपुराणा पोलिस ठाण्यात कलम 302 अन्वये गुन्हा दाखल केला होता.

पत्नी और दो बच्चों की हत्या के बाद खुदकुशी

7) पत्नी आणि दोन मुलांची हत्या करून सुसाईड –
मार्च 2019 मध्ये रोहतक येथील शेतकरी बिजेंद्र यांनी आपली पत्नी आणि दोन मुलांना क्रूरतेने मारले. कर्जामुळे बुडालेल्या शेतकऱ्याने नैराश्यातून हे पाऊल उचलले होते. हत्या इतक्या क्रूरतेने केली होती की पोस्टमार्टम करणारे देखील आश्यर्यचकित झाले होते. त्यानंतर या शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली होती.

पत्नी और तीन बच्चों की हत्या

8) पत्नी आणि तीन मुलांची हत्या –
जून 2019 मध्ये पंजाब मधील अमृतसर येथे अनैतिक संबंधांमध्ये अडथळा बनलेल्या पत्नीला, दोन मुलांना आणि एका मुलीला मारून जवळच्या कालव्यात फेकून देण्यात आले होते. या प्रकरणातील आरोपी हरवंत सिंग, त्याचा पुतण्या कुलदीप सिंग आणि इतर दोन साथीदारांना अटक करण्यात आली आहे. सर्वजण झोपलेले असताना ही घटना घडली. चौघांचा मृत्यू झाला तेव्हा हरवंतने प्रथम कुलदीप आणि त्याच्या दोन साथीदारांच्या मदतीने रक्ताचे डाग धुतले. मग त्यांच्या मृतदेहामध्ये विटा बांधून त्यांना पोत्यात घालून कालव्यामध्ये फेकून दिले.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/