तरुणींचा ऑनलाईन सौदा, नागपूरात हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा भंडाफोड

नागपूर : पोलीसनामा ऑनालईन – आंबटशौकिनांना व्हाट्स अपवर तरुणींचे अर्धनग्न फोटो पाठवून त्याद्वारे तरुणींचा सौदा करून चालविल्या जाणाऱ्या सेक्स रॅकेटचा नागपूर गुन्हे शाखेच्या पथकाने पर्दाफाश केला आहे. नागपूर गुन्हे शाखेने छत्रपती चौकातील लोटस सर्विस लॉजिंगवर छापा घालून एका तरुणीची सुटका केली. तर दलालाला अटक केली आहे. रविवारी दुपारी ही कारवाई करण्यात आली.

वैभव उर्फ आकाश विष्णू मानकर (२५, फुटाळा वस्ती, अंबाझरी) असे अटक करण्यात आलेल्या दलालाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑनलाईन तरुणींचे फोटो पाठवून सौदा करत त्याद्वारे मोठमोठ्या हॉटेल्समध्ये तरुणींना पाठवून सेक्स रॅकेट चालविले जात असल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त निलेश भरणे यांना मिळाली. त्यानुसार सामाजिक सुरभा विभागाचे प्रमुख उमेश बेसरकर यांच्या पथकाने इंटरनेटवरून एस्कॉर्ट सर्विसची पडताळणी केली. त्यासाठी बनावट ग्राहक पाठवविला. त्याने ग्राहकाला तरुणी पुरविल्यानतंर वैभव मानकरला अटक केली.

असा चालवत होता सेक्स रॅकेट

वैभव हा मुळचा चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीडचा रहिवासी आहे. तो दोन वर्षांपासून सेक्स रॅकेट सुरु केले होते. ‘हॉट गर्ल्स डॉट नागपूर’ नावाने एस्कॉर्ट सर्विस सुरु केली. ऑनलाईन मुलींचा सौदा केला जात होता. आंबट शौकीनांना हॉट गर्ल्स नावाच्या वेबसाईटवर काही मुलींचे फोटो वैभवने अपलोड केले.

त्यानंतर तेथे तरुणीची निवड केल्यावर ग्राहकाला फोन करून रेट फिक्स केला जात होता. त्यासोबतच ग्राहकाला व्हाटसअप वर तरुणींचे अर्धनग्न फोटो पाठवत होता. त्यावरून त्यांचा रेट फिक्स करत होता. तसेच ग्राहकाला भेटून पैसे घेतल्यानतंर तो हॉटेलच्या रुम नंबरची चावी देऊन पाठवत होता. यासाठी त्याने उच्च शिक्षित तरुणींना जाळ्यात ओढत होता.

पोलिसांनी सुटका केलेली तरुणी महालगाव परिसरातील राहणारी असून ती एका वाहन विक्रीच्या कंपनीत नोकरी करत होती. परंतु झटपट पैसा कमविण्याच्या अमिषाने तिने या व्यवसायात प्रवेश केला.

You might also like