पुण्यात हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा ‘पर्दाफाश’ ; ‘फॉरेनर’ तरुणीची सुटका

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – परदेशातील तरुणींना पैशाचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करुन घेत असल्याच्या माहितीवरुन कोरेगाव पार्क पोलिसांनी हॉटेल मींट येथे छापा घालून एका उजबेकिस्तान तरुणीची सुटका केली.

याप्रकरणी एजंट राजन यांच्याविरुद्ध कोरेगाव पार्क पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. कोरेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार दिनेश शिंदे यांना याबाबत माहिती मिळाली. एजंट राजन हा वेगवेगळ्या हॉटेलमध्ये तरुणी ठेवून स्वत: तसेच एजंट साथीदारांच्या सहाय्याने ग्राहकांना तरुणींचे फोटो पाठवून वेश्या गमनासाठी रक्कम ठरवून ग्राहकांना हॉटेलमध्ये पाठवितो किंवा ग्राहकांच्या मागणीनुसार संबंधित ठिकाणी पाठवितो व ग्राहकांकडून ५ हजार रुपये घेऊन त्यातील ठराविक हिस्सा काढून घेतो.

तरुणींना पैशाचे आमिष दाखवून त्यांना पुण्यात आणून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करुन घेत असल्याचे समजले. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक मदन बहाद्दरपूरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी साऊथ मेन रोडवरील हॉटेल मींट येथे छापा घातला. त्यात एक उजबेकिस्तान देशाची तरुणी आढळून आली. या परदेशी तरुणीला मुंढव्यातील शासकीय महिलागृहात ठेवण्यात आले आहे. एजंट राजन याचा पोलीस शोध घेत आहेत.

ही कारवाई पोलीस उपायुक्त बच्चनसिंग, सहायक पोलीस आयुक्त डॉ. प्रिती टिपरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मदन बहाद्दरपूरे, पोलीस उपनिरीक्षक कल्याणी शिंदे, कर्मचारी हर्षदा शिंदे, रियाज शेख, सुनिल करंवद, दशयथ यावंत यांनी केली.

You might also like