पुण्यात हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

पुणे: पोलीसनामा ऑनलाईन

पुण्यातील शिवाजीनगर बस स्थानकासमोरील हॉटेल पार्क लॉजिंग येथे सुरु असलेल्या हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. परराज्यातील मुलींकडून पैशाचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेतला जात होता. याप्रकरणी एका महिलेस पोलिसांनी अटक केली आहे.

याप्रकरणी रंजिता नंदकुमार राऊत (वय २९ रा. साम्राज्य नगर ,गणपती अपार्टमेंट ,अमरावती) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणातील पीडित महिलांना रेस्क्यू होम महम्मदवाडी हडपसर येथे संरक्षणासाठी ठेवले आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रंजिता राऊत ही बाहेरील राज्यातील तसेच राज्यातील विविध शहरातील मुलींना पैशाचे आमिष दाखवून शिवाजीनगर बसस्थानकासमोर हॉटेल पार्क लॉजिंग येथे वेश्या व्यवसाय करून घेत होती. यासाठी तिने याठिकणी महिलांना आणून ठेवले असल्याची माहिती पोलीस हवालदार नितीन तरटे यांना गुप्त बातमीदाराकडून समजली. यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पाटील सामाजिक सुरक्षा विभाग ,गुन्हे शाखा यांनी तात्काळ छापा टाकून दोन पीडित मुलींची वेश्याव्यवसायातून सुटका करून त्यांना रेस्क्यू होम येथे ठेवण्यात आले.

ही कारवाई अपर पोलीस (गुन्हे) आयुक्त प्रदीप देशपांडे , उप पोलीस आयुक्त (गुन्हे) पंकज डहाणे ,सह पोलीस आयुक्त (गुन्हे-२) संजय निकम यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पाटील ,सह पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव ,सहायक पोलीस फौजदार नामदेव शेलार ,पोलीस कर्मचारी नितीन तरटे ,राजाराम घोगरे ,नितीन तेलंगे ,रमेश लोहकरे ,तुषार आल्हाट ,नितीन लोंढे ,सुनील नाईक ,सचिन कदम ,सचिन शिंदे,संदीप गिऱ्हे ,ननीता येळे ,गीतांजली जाधव ,अनुराधा ठोंबरे ,सुप्रिया शेवाळे ,सरस्वती कागणे तसेच शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रभाकर शिंदे आणि त्यांचा स्टाफ यांच्या मदतीने कारवाई पूर्ण केली.

You might also like