विमाननगरमध्ये हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – विमाननगर परिसरातील साकोरेनगर येथील मींटवर छापा टाकून विमानतळ पोलिसांनी हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी छापा टाकल्यानंतर उझबेकीस्तान व भारतीय अशा दोन तरुणींची सुटका केली तर दोन एजंटांना अटक केली आहे.

विशाल महादू निरमळ (२६, वडगाव मावळ), कृष्ण प्रकाश नायर (२३, वाकड) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. तर गणेश, रेणून नेपाळी व विशाल नावाच्या आणखी तीन एजंटांवर विमानतळ पोलीस ठाण्यात इटपा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विमाननगर परिसरात असलेल्या मींट हॉटेलमध्ये परदेशी व भारतीय मुलींकडून देहविक्रय करून घेतला जात असल्याची माहिती विमानतळ पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी तेथे गिऱ्हाईक पाठवून पडताळणी केली. त्यानंतर तेथे छापा टाकला. त्यावेळी पोलिसांनी तेथून उझबेकीस्तान व आसाममधील एक अशा दोन तरुणींची सुटका केली. तर दोन एजंट विशाल निरमळ व कृष्ण प्रकाश नायर या दोघांना पोलिसांनी अटक केली. तर त्यांचे साथीदार गणेश, रेणून नेपाली, विशाल अशा इतर तीन जणांवर गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. तर सुटका केलेल्या तरुणींची रवानगी रेस्क्यू होममध्ये करण्यात आली आहे.

ही कारवाई पोलीस उपायुक्त प्रसाद अक्कानवरू, सहायक पोलीस आयुक्त शिवाजी पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील, पोलीस निरीक्षक गुन्हे बलवंत मांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक खोकले, स्वप्नील जाधव संकपाळ, शिवले, मोटे, महिला पोलीस नाईक पवार यांच्या पथकाने केली.