पुण्यातील हाय प्रोफाइल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश ; मॉडेलिंग करणाऱ्या तरुणीची सुटका

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पुण्यातील कोरेगाव पार्क येथील एका उच्चभ्रू सोसायटीत चालणाऱ्या हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. या कारवाईत मॉडेलिंग करणाऱ्या दिल्ली येथील तरूणीची सुटका करण्यात आली. ही कारवाई कोरेगाव पार्क येथील लेन नं.५ समोरील एका उच्चभ्रू सोसायटीत करण्यात आली.

कारवाई दरम्यान रोहित भगवान कांबळे (वय-२८ रा. महादेव मंदिराजवळ, काळेपडळ, हडपसर) याला अटक करण्यात आली आहे. तर त्याच्या इतर दोन साथीदारांचा पोलीस शोध घेत आहेत. ही कारवाई गुन्हे शाखेच्या युनिट -२ आणि सामाजिक सुरक्षा विभागाच्या वतीने संयुक्तपणे करण्यात आली.

कोरेगाव पार्क येथील एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये दिल्ली येथे मॉडेलिंग क्षेत्रात करीयर करणाऱ्या तरुणींना फुस लावून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करवून घेतला जात असल्याची माहिती अपर पोलीस आयुक्त गुन्हे अशोक मोराळे यांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे गुन्हे शाखा युनिट-२ आणि सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकांना कारवाईच्या सुचना देण्यात आल्या. पथकाने उच्चभ्रू सोसायटीत बनावट ग्राहक पाठवून खात्री करून घेतली. ग्राहकाने इशारा करताच पथकाने या ठिकाणी छापा टाकून आरोपी रोहीत कांबळे याला अटक करून एका दिल्ली येथील तरुणीची सुटका केली. सुटका करण्यात आलेल्या मुलीला रेस्क्यु होममध्ये पाठवण्यात आले.

अटक करण्यात आलेल्या आरोपीकडे चौकशी केली असता, तो त्याच्या इतर दोन साथिदारांच्या मदतीने फोनवर बुकिंग घेऊन मुली पुरवण्याचे काम करत असल्याचे कबुल केले. आरोपीला अटक करून त्याच्यावर कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दखल करण्यात आला आहे. पुढील तपास कोरेगाव पोलीस करीत आहेत.

हि कारवाई अपर पोलीस आयुक्त गुन्हे अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त गुन्हे शिरीष सरदेशपांडे, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे १ समीर शेख, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे २ भानुप्रताप बर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट २ चे प्रभारी पोलीस निरीक्षक गजानन पवार, सामाजिक सुरक्षा विभागाच्या पोलीस निरीक्षक वैशाली चांदगुडे, गुन्हे शाखा युनिट २ चे पोलीस उपनिरीक्षक नितीन शिंदे, आंब्रे, पोलीस हवालदार गडांकुश, गायकवाड, जाधव, शेख, कांबळे, चोरमोले, सामाजिक सुरक्षा विभागाचे मोकाशी, शिंदे, मोहिते, मदने यांच्या पथकाने केली.

आरोग्यविषयक वृत्त