पुण्यातील उच्चभ्रु परिसरातील सेक्स रॅकेटवर पोलीसांचा छापा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरेगांव पार्क परिसरात स्पा सेंटरच्या नावाखाली चालणार्‍या उच्चभ्रु सेक्स रॅकेटचा गुन्हे शाखेच्या पोलिसांनी छापा टाकून पर्दाफाश केला. येथून चार महाराष्ट्रीयन मुलींची सुटका करण्यात आली आहे.

याप्रकरणी मॅनेजर मनीष यशवंत रांजवन (वय 36, रा. मुळ. जि. सांगली) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. स्पा मालकीन रंजना कपूर हिचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे. याप्रकरणी कोरेगांव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोरेगाव पार्क येथील लेन. नं. 7 मधील नमस्ते वेलनेस स्पा मध्ये मसाजच्या नावाखाली वेश्या व्यवसाय करुन घेतला जात असल्याची माहिती पोलीस शिपाई संतोष भांडवलकर यांना मिळाली होती. त्यानुसार, या माहितीची बनावट ग्राहकाद्वारे खातरजमा करण्यात आली. त्यानुसार, उपायुक्त बच्चन सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक आण्णा माने तसेच नीलम शिंदे, संतोष भांडवलकर, पुष्पेंद्र चव्हाण यांच्या पथकाने याठिकाणी छापा टाकला. त्यावेळी चार महाराष्ट्रातील मुलींची सुटका करण्यात आली. तर, मॅनेजर मनीष याला पकडण्यात आले. मनीष हा काही दिवसांपुर्वीच येथे काम करण्यास आला होता. स्पा मालकीन रंजना कपूर हिचा असल्याचे सांगण्यात येत आहे. तिचा पोलीस शोध घेत आहेत.

फेसबुक पेज लाईक करा –  https://www.facebook.com/policenama/