टुरिस्ट व्हिसावर आलेल्या परदेशी युवतींचा सेक्स रॅकेटमध्ये समावेश

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

कोंढवा पोलिसांनी कोंढवा परिसरातील दोराबजी मॉलच्या दुसर्‍या मजल्यावर चालु असलेल्या एका मसाज सेंटरवर छापा टाकून हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. मसाज सेंटरच्या महिला मॅनेजरला अटक करण्यात आली असून पाच युवतींची सुटका करण्यात आली आहे. सुटका करण्यात आलेल्या युवतींमध्ये थायलंड येथील एका युवतीचा समावेश असून ती टुरिस्ट व्हिसावर भारतात आल्याचे पोलिसांच्या तपासात उघडकीस आले आहे.

पेटेखीव हुतरई पमाई (37, रा. शिवनेरीनगर, लेन नं. 12, कोंढवा) हिला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यातील महिला पोलिस उपनिरीक्षक प्रिया सुधाकर टिळेकर यांनी फिर्याद दिली आहे. पमाई हिच्याविरूध्द भादंवि 370(अ), 370(3) सह 3,4,5 इटपा अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोंढवा पोलिसांना दोराबजी मॉल येथील दुसर्‍या माळयावरील थाई वेलनेस स्पा या मसाज सेंटरमध्ये देशी व परदेशी थेरीपीस्टकडून वेश्याव्यवसाय करून घेतला जात असल्याची माहितती मिळाली होती. मिळालेल्या माहितीची खातरजमा करण्यात आली. स्पा सेंटरमध्ये बनावट ग्राहक पाठविण्यात आले. अप्पर आयुक्‍त सुनिल फुलारी, उपायुक्‍त प्रकाश गायकवाड, सहाय्यक आयुक्‍त मिलिंद पाटील, कोंढवा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मिलिंद गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक (गुन्हे) महादेव कुंभार, उपनिरीक्षक प्रिया टिळेकर, सहाय्यक उपनिरीक्षक देशमुख, पोलिस हवालदार विलास तोगे, गवळी, ढोले, थोरात, महिला पोलिस कर्मचारी गावडे आणि मुकाडे यांच्या पथकाने शुक्रवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास मसाज सेंटरवर छापा टाकला. तेथुन 5 युवतींची सुटका करण्यात आली. मसाज सेंटरच्या महिला मॅनेजरला ताब्यात घेण्यात आले आणि त्यानंतर तिला अटक करण्यात आली. सुटका करण्यात आलेल्या युवतींकडे चौकशी केली असता त्यापैकी एक युवती ही टुरिस्ट व्हिसावर भारतात आल्याचे निष्पन्‍न झाले आहे. गुन्हयाचा अधिक तपास कोंढवा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मिलिंद गायकवाड करीत आहेत.

जाहिरात

अमेरिकन नागरिकांची फसवणूक करणाऱ्या कॉल सेंटरवर छापा

जाहिरात

[amazon_link asins=’B07C2ZW7ZB,B06WLLY4GS’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’357d7f85-b32c-11e8-839c-d78850b21676′]

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like