पुण्यातील हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे शहरातील कोरेगाव पार्क येथील सलूनमध्ये आणि हॉटेलमध्ये मसाजच्या नावाखाली सुरु असलेल्या हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी मुलींची सुटका करून दोन आरोपींना अटक केली. ही कारवाई शनिवारी करण्यात आली.

कोरेगाव पार्क येथील ओएॅसिस सलून स्पामध्ये मसाजच्या सेंटर आणि एका पंचतारांकीत हॉटेलमध्ये मसाजच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकून मुलींची सुटाक करून विशाल शंभू पंडीत आणि आदित्य सुलेमान या दोघांना अटक केली. सुटका करण्यात आलेल्या मुली गरीब घरातल्या असून त्यांना पैशाचे अमिष दाखवून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करवून घेतला जात होता. सुटका करण्यात आलेल्या मुलींना हडपसर येथील रेस्क्यु होम येथे ठेवण्यात आले आहे.

ही कारवाई परिमंडळ २ चे पोलीस उपायुक्त बच्चन सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मदन बहाद्दरपुरे, पोलीस उप निरीक्षक चाळके, पोलीस कर्मचारी निशीकांत सावंत, हर्षदा शिंदे, रोहिणी दुंडे यांच्या पथकाने केली.