High Return Stocks | ‘हे’ शेयर्स करताहेत पैशाचा वर्षाव! करा इथं ‘इन्व्हेस्ट’, एका झटक्यात होईल मोठी कमाई; जाणून घ्या

नवी दिल्ली : High Return Stocks | सेन्सेक्सने 24 सप्टेंबरला व्यवसायाच्या जगात नवीन विक्रम स्थापन केला. अवघ्या 245 दिवसात सेन्सेक्सने 50 हजारवरून 60 हजाराचा आकडा गाठला. तर, निफ्टीसुद्धा 17900 च्या पुढे गेला. अशावेळी, आता गुंतवणूकदार थोडे संभ्रमात आहेत की, या सुपररॅलीत कुठे गुंतवणूक करावी? वर गेलेले शेयर्स चांगला रिटर्न देतील का? की पुन्हा अंडरपरफॉर्मर असलेल्या स्टॉकवर फोकस करावे? किंवा आता डिफेन्सिव्ह थीमवर चालणे चांगले ठरेल? (High Return Stocks)

विचारपूर्वक लावा पैसे

फॉर्च्युन फिस्कलचे डायरेक्टर जगदीश ठक्कर यांच्यानुसार, बाजारात छोट्या गुंतवणुकदारांचा सहभाग वाढत आहे. सध्या BSE वर गुंतवणुकदारांची खाते संख्या 8 कोटीपेक्षा जास्त आहे. जी 16 ते 17 महिन्यापूर्वी 5 कोटींच्या जवळपास होती. तर ग्लोबल फॅक्टरशिवाय एफआयआय आणि डीआयआयसुद्धा बाजारात भरपूर पैसा लावत आहेत, आणि यामुळे हे तेजी आली आहे.

‘झी बिझनेस’नुसार, जगदीश ठक्कर यांनी सांगितले की, सध्या व्हॅल्युएशनबाबत चिंता आवश्य आहे, परंतु मोठ्या कालावधीच्या गुंतवणुकदारांसाठी कोणतीही अडचण नाही. परंतु, गुंतवणुकदारांनी सध्याच्या काळात विचार न करता गुंतवणूक करू नये. हाय व्हॅल्युएशननंतर सुद्धा बाजारात अजूनही अनेक क्वालिटी शेयर्स आहेत, ज्यांचे फंडामेंटल चांगले आहे. मात्र सध्या डिफेन्सिव्ह मानल्या जाणार्‍या सेक्टरकडे वळता येऊ शकते. (High Return Stocks)

Vijay Shivtare | ‘मी मावळ मध्ये जनरल डायरसारखा लढलो, पण…’, माजी मंत्री विजय शिवतारेंनी खंत व्यक्त करत दिला ‘हा’ इशारा (Video)

रिप्रायजिंगच्या रूपात बाजार

ट्रेड स्विफ्टचे डायरेक्टर संदीप जैन यांच्यानुसार, बाजारातील या तेजीला रिप्रायजिंग प्रमाणे घेतले पाहिजे. शेयर बाजारात जबरदस्त तेजी आली आहे यासाठी डिफेन्सिव्ह थीमच चांगली आहे. फार्मा, IT आणि FMCG सेक्टरवर विश्वास ठेवता येऊ शकतो.

बाजाराच्या तेजीत सुद्धा फार्मा सेक्टरचे अनेक स्टॉक अंडरपरफॉर्मर राहिले आहेत, तर त्यांचे फंडामेंटल चांगले आहे. अशावेळी संदीप जैन यांचे म्हणणे आहे की, सध्याच्या काळात ITC, नवनीत एज्युकेशन, Infosys, सायबर टेक सिस्टम, Cipla आणि FDC जास्त अ‍ॅट्रॅक्टिव्ह दिसत आहे.

हे सेक्टरसुद्धा करू शकतात मालामाल

फार्मा, आयटी आणि एफएमसीजीशिवाय कॅपिटल गुड्स, इन्फ्रा, आटो अँसिलरी, टेक्सटाईल, एनर्जी आणि Oil & Gas संबंधी शेयरवर फोकस केला जाऊ शकतो. यामध्ये अनेक शानदार फंडामेंटल आणि आकर्षक व्हॅल्युएशनचे शेयर आहेत. अनलॉक थीमसंबंधी सेक्टर सुद्धा पुढे विनर बनू शकतात. केवळ हे लक्षात ठेवले पाहिजे की, आता केवळ क्वालिटी शेयरच निवडावे.

सेन्सेक्सची वाटचाल

1000 च्या पुढे :  25 जुलै 1990

10000 च्या पुढे : 07 फेब्रुवारी 2006

20000 च्या पुढे : 11 डिसेंबर 2007

30000 च्या पुढे : 26 एप्रिल 2017

40000 च्या पुढे : 03 जून 2019

50000 च्या पुढे : 03 फेब्रुवारी 2021

60000 च्या पुढे : 24 सप्टेंबर 2021

डिस्क्लेमर : (येथे दिलेला मजकूर केवळ माहितीच्या हेतूने दिलेला आहे. येथे सांगणे आवश्यक आहे की, मार्केटमधील गुंतवणूक बाजार जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणुकदार म्हणून पैसे लावण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. www.policenama.com कडून कुणालाही पैसे लावण्याचा कधीही सल्ला दिला जात नाही.)

हे देखील वाचा

Sanjay Raut | सव्वा रुपये तर मी वसूल करणारच, संजय राऊतांचा चंद्रकांत पाटील यांना सणसणीत टोला (व्हिडीओ)

Multibagger Stock Tips | तीन महिन्यात 1 लाख रुपये झाले 15 लाख रुपये, ‘या’ स्टॉकने केली कमाल; जाणून घ्या

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  High Return Stocks | High return stocks you should invest in defensive theme best stocks and sector sensex from 50k to 60k in just 245 days share market news

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update