High Salary Jobs | देशात पुन्हा परतणार मोठ्या पगाराचा काळ ! सन 2022 मध्ये नोकरदारांना मिळेल 9.3 % पगारवाढ; कंपन्या सुद्धा करतील ‘बंपर’ नियुक्त्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – High Salary Jobs | कोरोना व्हायरस महामारीमुळे निर्माण झालेल्या आर्थिक स्थितीतून सावरल्यानंतर भारतात मोठ्या पगाराचा (High Salary Jobs) चा काळ पुन्हा येईल. आशा आहे की, पुढील वर्षापासून लोकांना पुन्हा जास्त पगाराच्या नोकर्‍या मिळण्यास सुरूवात होईल.

 

एका रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, 2021 च्या दरम्यान भारतात कर्मचार्‍यांच्या वेतनात सरासरी वाढ (Salary Hike) होईल. जागतिक सल्लागार, ब्रोकिंग कंपनी विलिस टॉवर्स वॉटसनच्या ‘सॅलरी बजेट प्लान रिपोर्ट’मध्ये म्हटले आहे की, कंपन्यांसमोर कर्मचार्‍यांना आकर्षित करणे आणि त्यांना सोबत गुंतवून ठेवण्याचे मोठे आव्हान आहे. यामुळे कंपन्या आपल्या कर्मचार्‍यांना पहिल्याच्या तुलनेत जास्त वेतनवाढ (High Salary Jobs) देतील.

 

किती होऊ शकते वेतनवाढ?
अहवालात म्हटले आहे की, आशिया-पॅसिफिकमध्ये पुढील वर्षी सर्वात जास्त वेतनवाढ भारतात होईल. या दरम्यान येथे कर्मचार्‍यांच्या वेतनात सरासरी (Average Increment) 9.3 टक्केची वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त (High Salary Jobs) केली जात आहे.

 

सर्वेत 435 कंपन्या भारतातील
सोबतच अहवालात म्हटले आहे की, पुढील 12 महिन्यात व्यावसायिक स्थितीत (Business Outlook) सुधारणा झाल्याने नोकर्‍यांची स्थिती सुधारेल. हा सहामाही सर्वे मे आणि जून 2021 च्या दरमयान आशिया-पॅसिफिकच्या विविध उद्योग क्षेत्रातील 1,405 कंपन्यांमध्ये करण्यात आला. यापैकी 435 कंपन्या भारतातील आहेत.

 

तीनपट कंपन्या करतील नियुक्त्या
वेतन बजेट योजना रिपोर्टनुसार, 52 टक्के भारतीय कंपन्यांचे म्हणणे आहे की,
पुढील 12 महिन्यात त्यांची महसूल स्थिती (Revenue Outlook) सकारात्मक (High Salary Jobs) राहिल.
2020 च्या चौथ्या तिमाहीत असे मानणार्‍या कंपन्यांची संख्या 37 टक्के होत्या. व्यावसायिक स्थितीत सुधारणा झाल्याने नोकर्‍यांची स्थिती सुधारेल.

रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, 30 टक्के कंपन्या पुढील एक वर्षाच्या दरम्यान नवीन नियुक्त्यांची तयारी करत आहेत.
हे 2020 च्या तुलनेत जवळपास तीपट जास्त आहे.

 

कोणत्या सेक्टरमध्ये मिळतील नोकर्‍या?
इंजिनियरिंग सेक्टरमध्ये 57.5 टक्के, माहिती तंत्रज्ञानमध्ये 53.3 टक्के, तांत्रिक कौशल्यात 34.2 टक्के,
सेल्स सेक्टरमध्ये 37 टक्के आणि फायनान्स सेक्टरमध्ये 11.6 टक्के कंपन्यांमध्ये सर्वात जास्त नवीन भरती पहायला मिळेल.

 

जुन्या कर्मचार्‍यांनाही मिळेल वेतनवाढ
या सर्व सेक्टरमध्ये कंपन्या नवीन कर्मचार्‍यांना मोठ्या वेतनाची ऑफर देतील.
तर, जुन्या कर्मचार्‍यांना वेतनात पहिल्यापेक्षा जास्त वाढ (High Salary Jobs) करतील.
अहवालात म्हटले आहे की, भारतात नोकरी सोडण्याचा दर सुद्धा आशिया-पॅसिफिस क्षेत्रातील इतर देशांच्या तुलनेत कमी होता.

 

Web Title :- High Salary Jobs | the era of high salary will return in india employees will get 9 3 percent increment in 2022 says report news in marathi

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Prabhas | ‘राधेश्याम’ चित्रपटाचं नवीन पोस्टर झालं रिलीज, ‘प्रभास’च्या वाढदिवसादिवशी होणार ट्रेलर रिलीज

Aurangabad Crime | WhatsApp च्या ‘स्टेटस’वर ‘गुड बाय’ लिहून हिंगोलीच्या उच्चशिक्षीत तरूणाची औरंगाबादमध्ये आत्महत्या

Coronavirus in Maharashtra | दिलासादायक ! राज्यात गेल्या 24 तासात 2,879 ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी