इकडं ‘कॅश’मध्ये ‘घेणं-देणं’ केल्यास तिकडं तात्काळ मेसेजद्वारे ‘इन्कम टॅक्स’ची ‘नोटीस’ मिळणार, आता होणार ‘रिअल टाइम मॉनिटरिंग’

नवी दिल्ली : वृत्त संस्था – इन्कम टॅक्स डिपार्टमेन्ट आता हाय व्हॅल्यू ट्रांजक्शनचे रियल टाइम मॉनिटरिंग करणार आहे. सोबतच रिटर्न भरताना प्री-फिल्ड फॉर्ममध्ये कॅपिटल गेन, डिव्हिडन्ट आणि व्याजातून होणार्‍या कमाईच्या डिटेल्सची माहिती अगोदच असेल. इन्कम टॅक्स डिपार्टमेंट ट्रांजक्शनसंबंधी टॅक्सपेयरशी थेट संपर्क करू शकते. सोबतच विभागाकडून एसएमएस, मेलद्वारे ट्रांजक्शनच्या डिटेल्स मागितल्या जाऊ शकतात.

हाय व्हॅल्यू ट्रांजक्शन्सवर टॅक्स विभागाची नजर

हाय-व्हॅल्यू ट्रांजक्शनवर आयटी विभागाची नजर असणार आहे. आयकर विभाग बँक ट्रांजक्शनची रियल टाइम देखरेख करणार आहे. सध्या बँका ई व्हॅल्यू ट्रांजक्शन्सची माहिती थेट टॅक्स विभागाला देत नाहीत. केवळ ट्रांजक्शनच्या मासिक, तिमाही डिटेल दिल्या जातात. टॅक्सपेयरशी संपर्कासाठी मोबाइल अ‍ॅप लॉन्च करण्यात येईल.

प्री-फिल्ड रिटर्नमध्ये बदल
आता प्री-फिल्ड रिटर्नमध्ये म्युच्युअल फंड, शेयरद्वारे झालेल्या कमाईची माहिती द्यावी लागेल. डिव्हिडंट, व्याजाचे इन्कमसुद्धा फॉर्ममध्ये अगोदरच दिसेल. डिव्हिडंटवर टीडीएसची माहती फॉर्म-16 मध्ये द्यावी लागेल. 5,000 रुपयांपेक्षा जास्त डिव्हिडंट इन्कमवर टीडीएस कापण्याचा नियम आहे. स्वीडनसारख्या काही देशात प्री-फिल्ड टॅक्स रिटर्न फॉर्मची कन्सेप्ट यशस्वीपणे लागू झाली आहे. भारताने मागील वर्षी काही अंशी याची सुरूवात केली होती. आयटी विभाग यासाठी एजन्सीकडून माहिती घेणार आहे. ही माहिती विभागाला सेबी, आरबीआय आणि बँकांकडून मिळेल.

फायनान्स बिलात बदल करून आयटी विभागाला याचा अधिकार देण्यात येईल. आयटी विभाग मोठ्या ट्रांजक्शनवर लक्ष ठेवणार आहे. टॅक्सपेयर्सला ताबडतोब देय रकमेची माहिती दिली जाईल. विभाग अ‍ॅपद्वारे टॅक्सशी संबंधित माहीती देईल.