उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत साधणार Facebook Live वरून विद्यार्थ्यांशी संवाद

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन  – जसा उद्योगधंद्यांना कोरोनामुळे मोठा फटका बसला आहे तसाच फटाक शिक्षणालाही बसला आहे. गेले 50 हून अधिक दिवस सगळ्या शाळा-कॉलेजचे विद्यार्थी-विद्यार्थिनी घरी बसले आहेत. त्यांना चिंता आहे त्यांच्या भविष्याची.

कोरोनामुळे झालेल्या परिणामामुळे पुढचे शिक्षण कसे होईल ही सर्वांना लागलेली चिंता आहे. 10 वी 12 वीमध्ये असलेल्या विद्यार्थ्यांचं भवितव्य काय ? 12 नंतरच्या प्रवेश परीक्षा त्यांना देता येतील का ? कोरोनासोबत जगताना जून पासून सगळं शिक्षण ऑनलाइन होणार का ? या आणि अनेक प्रश्नांची उत्तर हे विद्यार्थी, पालक शिक्षक यांना हवी आहेत.

त्यासाठी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत आज 19 मेला दुपारी 4.30 वाजता Facebook Live च्या माध्यमातून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. कॉलेजमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अनके प्रश्नांना यातून उत्तरे मिळतील अशी अपेक्षा आहे.