महाराष्ट्रातील पुरूष दारू पिण्यात देशात ‘या’ क्रमांकावर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राष्ट्रीय कुटूंब आरोग्य सर्वेक्षण २०१९-२० च्या नुसार मद्यपान करण्याच्या बाबत तेलंगणाने गोव्याला मागे टाकत पहिला क्रमांक पटकावला आहे. तर तंबाखूच्या सेवनात ईशान्येकडील राज्ये पहिल्या स्थानावर आहेत. त्याचप्रमाणे सिक्कीमच्या महिला मद्यपान करण्यात सर्वात पुढे आहेत.

काश्मीर, गुजरातमधील पुरुष सर्वात कमी मद्यपान करतात
या सर्वेक्षणानुसार कर्नाटकमधील पुरुष सर्वाधिक मद्यपान करत असून, दारू पिण्याच्या बाबत महाराष्ट्रातील पुरुष देशात तिसऱ्या क्रमांकावर आहेत. दारुबंदी असलेल्या गुजरात आणि जम्मू-काश्मीरमधील पुरुष सर्वात कमी मद्यपान करतात. दरम्यान, गेल्या सर्वेक्षणाच्या तुलनेत यंदा मद्यपान करणाऱ्यांच्या संख्येत बदल झाले की नाही याची माहिती समोर आली नाही. २०१५-१६ ला करण्यात आलेल्या सर्वेक्षणावेळी १५ ते ४९ वयोगटातील नागरिकांचे सर्वेक्षण केले होते. तर आता १५ वर्षावरील सर्व नागरिकांचा समावेश आहे.

मद्यपानाच्या बाबत सिक्कीमच्या महिला अव्वल
ईशान्येकडील सिक्कीम राज्यातील महिला १६.२% आकडेवारीसोबत मद्यपानात देशात अव्वल आहेत. तर दुसऱ्या क्रमांकावर आसाम असून तेथे ७.३% महिला मद्यपान करतात. तर दारू पिण्याच्या बद्दल तेलंगणाचे पुरुष पहिल्या क्रमांकावर असून तेथील महिलाही दारू पिण्यात तिसऱ्या क्रमांकावर आहेत. सर्वेक्षणानुसार गोवा आणि तेलंगणा सोडून ईशान्येकडील महिला सर्वाधिक मद्यपान करतात.

… म्हणून खेड्यातील महिला जास्त दारू पितात
देशातील अनेक ठिकाणी शहरी महिलांपेक्षा खेड्यातील स्त्रिया तुलनेच्या मानाने जास्त दारु पितात. गावातील स्त्रिया मद्यपान करते असे सांगण्यात अजिबात संकोच करत नाही. मात्र, शहरी महिला याबाबत सांगताना थोडा संकोच करतात, हे यामागचे कारण असू शकते.

दारुपेक्षा अधिक तंबाखूचे सेवन
तंबाखूजन्य पदार्थावर कर्करोगाची जाहिरात झापली असली तरीही देशात सर्व राज्यांमध्ये तंबाखूचा वापर सर्वाधिक आहे. पूर्वीच्या सर्वेक्षणात असेही समोर आले होते की लोक दारुपेक्षा जास्त तंबाखुचे प्रचंड व्यसन करतात.

तंबाखूचे सेवन करण्यात ईशान्येकडील राज्ये आघाडीवर
तंबाखूच्या वापराच्या बाबत ईशान्येकडील मिझोराम राज्य आघाडीवर असून, तेथील ७७.८ टक्के पुरुष तंबाखूचे सेवन करतात तर ६५ टक्के स्त्रियांनाही तंबाखूचे व्यसन आहे. ईशान्य राज्यात महिला व पुरुषांत तंबाखूचा वापर सर्वाधिक आहे. दक्षिणेकडील केरळ राज्यात तंबाखूचा सर्वात कमी वापर होतो, तेथील केवळ १७ टक्के जनता तंबाखूचे सेवन करतात. गोव्यातील १८ टक्के पुरुष तंबाखू खातात. हिमाचल प्रदेशातील १.७ टक्के नागरिक तंबाखूचे सेवन करतात.